‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरमलू’ हा चित्रपट हिंदीमध्ये रिलीज होणार होता. निर्माता मनिष शाह यांच्याकडे या चित्रपटाचे राइट्स होते. त्यांना हा चित्रपट २६ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा होता. पण या निर्मात्यांकडे या चित्रपटाच्या हिंदी रिमेक ‘शहजादा’चे राइट्स होते. पण कार्तिक आर्यननं निर्मात्यांना धमकी दिल्यानं त्यांनी हा चित्रपट ‘अला वैकुंठपुरमलू’ हिंदी भाषेत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मनिष शाह यांनी कार्तिक आर्यन आणि ‘अला वैकुंठपुरमलू’ चित्रपटाबाबत खुलासा केला. ते म्हणाले, ‘कार्तिक आर्यननं चित्रपट सोडण्याची धमकी दिली होती. कारण ‘अला वैकुंठपुरमलू’ हिंदीमध्ये प्रदर्शित झाला असता तर याचा हिंदी रिमेक असलेल्या ‘शहजादा’च्या कमाईवर फरक पडला असता. त्यामुळे या चित्रपटाचे इतर निर्माते ‘अला वैकुंठपुरमलू’ हिंदी भाषेत प्रदर्शित करण्याच्या विरोधात होते.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

मनिष शाह पुढे म्हणाले, ‘कार्तिक आर्यननं ‘अला वैकुंठपुरमलू’ हिंदी भाषेत प्रदर्शित झाला तर ‘शहजादा’ सोडण्याची धमकी दिली होती. जर कार्तिकनं हा चित्रपट अर्ध्यावर सोडला असता तर निर्मात्यांना तब्बल ४० कोटींचं नुकसान झालं असतं. मी ‘शहजादा’च्या निर्मात्यांना मागच्या १० वर्षांपासून ओळखत आहे. त्यामुळे माझ्या जवळच्या व्यक्तीचं एवढं नुकसान झालेलं मला अजिबात आवडलं नसतं. त्यामुळे मी ‘अला वैकुंठपुरमलू’ हिंदी भाषेत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात यामुळे मला २० कोटी रुपयांचं नुकसान झालं.पण हा निर्णय मी कार्तिकसाठी घेतला नाही. त्याचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही.’

अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला ‘अला वैकुंठपुरमलू’ हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. दोन वर्षांपूर्वी तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटनं १५० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यावेळी या चित्रपटाची बरीच चर्चा देखील झाली होती. ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता अल्लू अर्जुनचा हा चित्रपट देखील हिंदी भाषेत डब करून रिलीज केला जाणार होता.

दरम्यान कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या ‘शहजादा’ या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कार्तिक किती यशस्वी ठरतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण ‘अला वैकुंठपुरमलू’चं हिंदी भाषेतील प्रदर्शन रद्द झाल्यानं चाहत्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.