‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. आजवर अनेक गाण्यांना आवाज देणारी कार्तिकी कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. कार्तिकीच्या आजवरच्या यशात तिच्या आई वडिलांचा मोठा हात आहेच मात्र तिच्या भावाचाही यात मोलाचा वाटा आहे. नुकतंच कार्तिकीने तिच्या लहान भावाचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

कार्तिकीचा लहान भाऊ कौस्तुभ गायकवाड हा देखील तिच्याप्रमाणे उत्कृष्ट गायक आहे. नुकतंच कार्तिकीने इन्स्टाग्रामवर तिच्या लहान भावाचे अभिनंदन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. कार्तिकीचा लहान भाऊ कौस्तुभने त्यांचे वडील गायक व संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना मर्सिडीज गाडी भेट म्हणून दिली आहे. याचा एक व्हिडीओ कार्तिकीने शेअर केला आहे.

“बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालला नाही पण…”, हेमांगी कवीची ‘तमाशा लाईव्ह’साठी ‘खास’ पोस्ट चर्चेत

कार्तिकीने शेअर केलेल्या या व्हिडीओत कौस्तुभ हा एका फॉर्मवर सही करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्याचे वडील हे गाडीच्या शो रुममध्ये येतात. त्यानंतर मुलाने भेट म्हणून दिलेली मर्सिडीज गाडी पाहून ते क्षणभर थक्क होतात. यानंतर ते सर्वांची गळाभेट घेत असल्याचे या व्हिडीओ बघायला मिळत आहे.

“वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी माझ्या कौस्तुभ दादाने बाबांना Mercedes भेट दिली. खूप खूप शुभेच्छा”, असे तिने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. कार्तिकीच्या या व्हिडीओवर अभिनेत्री शिवानी बावकर हिने मनःपूर्वक अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी तिचे आणि तिच्या भावाचे अभिनंदन केले आहे.

सारेगमप लिटील चॅम्प्समुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं- कार्तिकी गायकवाड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वारकरी संप्रदायामध्ये कल्याणजी गायकवाड यांची वेगळी ओळख आहे. त्यामुळेच आळंदी आणि पंढरपूरमध्ये ते सेवा म्हणून कार्यक्रम आयोजित करतात. त्यांच्या या कार्यक्रमांना, त्यांचे अभंग ऐकण्यासाठी वारकरी संप्रदायाबरोबरच इतर क्षेत्रातील नागरिकांची अलोट गर्दी असते. कल्याणजी गायकवाड हे संगीत क्षेत्रात आपल्या वेगळ्या शैलीमुळे ओळखले जातात. त्यांनी संगीतबद्ध केलेले अभंग सुरेश वाडकर, अजय पोहनकर, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, वैशाली सामंत यांनी गायले आहेत.