मनोज वाजपेयीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’

‘अलिगड’मधील भूमिकेसाठी मनोजला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येईल.

प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याला ‘अलिगड’ या चित्रपटामधील अभिनयासाठी सर्वोत्तम अभिनेता श्रेणीतील ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. याविषयीची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहला यांनी ट्विटरद्वारे दिली.
‘अलिगड’ चित्रपटामधील प्राध्यापक रामचंद्र सिरस यांची मध्यवर्ती भूमिका साकारल्याबद्दल मनोज वाजपेयीला दादासाहेब फाळके पुरस्काराने भूषविण्यात येणार आहे, असे ट्विट चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केले. दरम्यान, या पुरस्काराने आपल्याला बहुमान मिळाल्याचे सांगत मनोजने त्याच्यावर प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमासाठी सर्वांचे आभार मानले आहेत. रविवारी मनोजला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
‘ट्रॅफिक‘ या आगामी चित्रपटामध्ये मनोज वाहतूक पोलीस हवालदाराच्या भूमिकेत दिसेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Manoj bajpayee to receive dadasaheb phalke award for aligarh