मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सध्या तो ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या दौऱ्यावर आहे. याच दरम्यान तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसतो. या नाटकाचे सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात याचे प्रयोग होत आहेत. यासाठी त्याचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

संकर्षणने नुकतेच इन्स्टाग्रामवर लाईव्ह सेशन केले होते, ज्यात त्याने माहिती दिली की त्याचे नाटक ‘तू म्हणशील तसं’ हे आता २५० प्रयोगांचा टप्पा पार करत आहे. पुण्यात २ दिवसात या नाटकाचे ४ प्रयोग असणार आहेत. या सेशनमध्ये त्याने प्रेक्षकांना आवहान केले आहे की त्यांनी हे नाटक पाहावे, तसेच त्यांनी नाटकाचा सेटदेखील या सेशनदरम्यान दाखवला.

या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, भक्ती देसाई प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या नाटकांचे लेखन संकर्षण कऱ्हाडे केले आहे तर दिग्दर्शनाची धुरा अभिनेता प्रसाद ओकने सांभाळली आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की नाटकाला संगीत दिले आहे. प्रशांत दामले यांनी नाटकाची निर्मिती केली आहे.

“धर्मेंद्रच सिनियर बाकी अमिताभ…” इंडस्ट्रीमधील अनुभवावर सचिन पिळगावकरांनी केलं भाष्य

संकर्षण सध्या मालिका आणि नाटक यामध्ये व्यस्त आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने यशचा मित्र समीर ही भूमिका साकारली आहे. संकर्षण लेखन, अभिनयाच्या बरोबरीने मालिकांमध्ये सुत्रसंचालनदेखील करतो. त्याच्या कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट आहे. भारताच्या सशस्त्र दलांना मानवंदना देणारा हा चित्रपट २०२४ साली प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.