scorecardresearch

Premium

“सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम…”, दिग्पाल लांजेकरांबरोबर ‘सुभेदार’ पाहून प्रवीण तरडेंनी केली पोस्ट, प्रतिक्रिया देत म्हणाले…

प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Pravin tarde

अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबरच कलाकारही या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. आता प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं, सर्वजण कौतुक करत आहेत. तर आतापर्यंत या चित्रपटाने नऊ हून अधिक कोटींची कमाई केली आहे. नुकताच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लांजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी हा चित्रपट त्यांना कसा वाटला हे सांगितलं आहे.

Shefali
Video: शेफाली शाहने पाहिलं रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेचं ‘चारचौघी’ नाटक, मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाली, “सगळ्या कलाकारांची कामं…”
addinath-kothare-mahesh-kothare
“बिअरचे चोरुन दोन घोट घेताच…”; आदिनाथ कोठारेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “बाबांनी मला…”
nawaj and anurag
“मला त्याला मारायला खूप मजा आली”; अनुराग कश्यपचं नवाजुद्दीन सिद्दीकीबाबतच वक्तव्य चर्चेत
tejashri pradhan (2)
“तेजश्री प्रधान खूप…” लोकप्रिय गायिकेने केला अभिनेत्रीच्या स्वभावाबद्दल खुलासा, म्हणाली…

आणखी वाचा : Subhedar box office collection: ‘सुभेदार’ची विक्रमी कामगिरी, पहिल्या वीकेंडला जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाच्या पोस्टरबरोबर कुटुंबीयांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलं, “रुबाबदार ‘सुभेदार’…काल सहकुटुंब सहपरिवार सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला. तो सुध्दा लेखक-दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लांजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, 1st day 1st show. तरी काल पुन्हा पहातानाही शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावांची भुमिका काय जबरदस्त साकारलीये अजयने. त्याची देहबोली आणि संवादफेक थेट साडेतीनशे वर्ष मागे घेउन जाते. दिग्पाल, मित्रा तू खरंच इतिहास जगतोस म्हणुनच तू साकारलेला बहिर्जी खुप सहजसुंदर होता. सिनेमा पहाताना राजदत्त गुरूजी, मंदार परळीकर या शिवभक्तांचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाचे तीन टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जीजाऊंचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडलेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकेच खरे आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर धर्माधिकारी तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खुप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाळे भाव खावून गेली. बिपीन सुर्वे, मृण्मयी आणि आस्ताद अप्रतिम.”

हेही वाचा : Video: ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याचा अनुभव, पडद्यामागचे किस्से अन् बरंच काही…; ‘सुभेदार’च्या टीमशी दिलखुलास गप्पा

पुढे त्यांनी लिहिलं, “निखिल लांजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी तुम्हाला १०० पैकी २०० गुण दिले पाहीजेत . शेवटच्या भैरवीसाठी निवडलेला तुकोबांचा अभंग अफलातून. अवधूत गांधीच्या आवाजाच्या तर मी प्रेमातच पडलोय. सुभेदारांचा पराक्रम सहकुटुंब नक्की बघा.” तर आता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. याबरोबरच “हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला” असंही लिहीत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor pravin tarde shared a special post after watching subhedar film with digpal lanjekar rnv

First published on: 04-09-2023 at 16:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×