अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या विनोदीशैलीमुळे घराघरांत लोकप्रिय आहे. ‘दे धक्का’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘टाईमपास’ या चित्रपटांमुळे सिद्धार्थ घराघरांत लोकप्रिय झाला. आता त्याने मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थने बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंहबरोबर ‘सिम्बा’ आणि ‘सर्कस’ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या ‘आता होऊ दे धिंगाणा २’ मधून सिद्धार्थ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
हेही वाचा : Video : हातात हात, खांद्यावर डोकं अन्…; आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडेचा ‘तो’ रोमँटिक व्हिडीओ व्हायरल
अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सध्या सिद्धार्थने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फास्टर फेणे’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. या चित्रपटात अमेय वाघ आणि पर्ण पेठेच्या साथीला सिद्धार्थ जाधवने अंबादास या रिक्षाचालकाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
‘फास्टर फेणे’मधील अंबादास आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. अंबादास या चित्रपटात उलटी रिक्षा चालवून बनेश फेणेला मदत करतो असं दाखवण्यात आलं आहे. या सिनेमाला २७ ऑक्टोबरला ७ वर्ष पूर्ण झाल्याने सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सिद्धार्थ जाधवची पोस्ट
Faster Fene .. 7 yrs complete…
आयुष्यातला एक असा क्षण.. मैत्रीला जागणारे मित्र. आणि मित्रासाठी पाठीशी उसे राहणारे मित्र..
आदित्य सरपोतदार भावा या सिनेमात काम करायची संधी दिलीस आणि कलाकार म्हणून एक वेगळाच आत्मविश्वास दिलास.. तुला तर माहितच आहे
क्षितीज पटवर्धन माझ्या पट्या yaar अंबादास… एक अजून असं intresting पात्र तू माझ्यात आणलस.. रिक्षा उलटी चालवली पण करिअरला सरळ दिशा मिळाली..
अमेय वाघ तुला खूप प्रेम.. यातच सगळ आलं… आता लवकर भेट…
आणि रितेश देशमुख सर मनापासून thnx .. lv uuu sirrr ..तुमचा support खूप महत्त्वाचा होता.
दरम्यान, २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या फास्टर फेणे चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केलं होतं. यामध्ये अमेय वाघ, पर्ण पेठे, दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच या चित्रपटाची निर्मिती रितेश देशमुखने केली होती.