अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. ती तिची मतं स्पष्टपणे मांडत असते. सोनाली कुलकर्णीने अलीकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये लग्नासाठी मुलगा शोधताना मुलींच्या अपेक्षा किती जास्त व अवाजवी असतात, याबद्दल ती बोलत आहे.

फक्त तब्बूबरोबर जास्त चित्रपट का करत आहेस? चाहत्याच्या प्रश्नाला अजय देवगणने दिलं उत्तर; म्हणाला, “तिच्या…”

सोनाली कुलकर्णी तिच्या व्हिडीओमध्ये म्हणते, “भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी, घर असेल, पगार वाढण्याची खात्री असेल. पण त्या मुलीत इतकी हिंमत नसते की ती एखाद्या मुलाला म्हणू शकेल की तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काय करेन.”

पुढे ती सर्वांना आवाहन करत म्हणाली, “तुमच्या घरात अशी स्त्री निर्माण करा, जी स्वतःसाठी कमवू शकेल. जी घरात सामान घ्यायचं असेल तर पतीला अर्धे पैसे देऊ शकेल. मला त्यांनी घरात भांडणं करावीत असं म्हणायचं नाही, पण महिला तितकी सक्षम असावी.” यावेळी तिने एका मैत्रिणीचा किस्सा सांगितला. मैत्रीण लग्नासाठी मुलगा शोधत होती आणि ५० हजारांपेक्षा कमी पगाराचा मुलगा नकोच, एकटा राहत असेल तर खूपच उत्तम, सासू सासरेही नको आणि त्याच्याकडे कार असावी, असं तिचं म्हणणं होतं. मी तिला म्हटलं की तू काय मॉलमध्ये आली आहेस का? तुला मुलगा हवाय की ऑफर हवी आहे. हे खरंच खूप अपमानास्पद आहे,” असं मत सोनालीने मांडलं.

Video: कन्नड येत नसल्याने विमानतळ अधिकाऱ्याने दिला त्रास; संतापलेला सलमान व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आपल्या पंतप्रधानांना…”

“मुलं १८ वर्षांची झाल्यावर त्यांना पैसे कमावण्याचा दबाव असतो. कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी येते. हे पाहून मला माझ्या या भावांसाठी रडायला येतं. माझा नवरा २० व्या वर्षी नोकरीला लागला आणि पैसे कमवू लागला. का? मुली तर २५-२७ वर्षांच्या होईपर्यंत फक्त विचारच करत असतात. तरी हनिमून भारतात नको परदेशात हवं, असा त्यांचा हट्ट असतो. आता तर विचारूच नका. डेस्टिनेशन वेडिंग्स, प्री-वेडिंग सगळं आलंय आणि त्याचा खर्चही त्या मुलाने करायचा असतो. का? तुम्हाला सर्व ऐशोआराम हवा असेल तर मग तुम्हीही कमवा. तुम्हीही शिका, नोकरी शोधा, चार ऑफिसमध्ये जा, कामासाठी विचारा, असं होत नाही,” असं सोनाली म्हणाली.

“उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे…” रोहित शेट्टीने सांगितलेलं मराठी कलाकारांना चित्रपटांत घेण्यामागचं कारण

“अनेक मुलींचं तर कौतुक केल्यावरही त्या एचआरकडे तक्रार करत असतात. त्याने म्हटलं की असे कपडे का घातले? पण जरा थांबा, आधी त्यांचं पूर्ण म्हणणं तर ऐकून घ्या. खरं तर सगळ्या मुली, महिला अशा असतात असं नाही. पण हे अग्रेशन आणि सतत मागण्या करणारा स्वभाव असलेल्या मुली झपाट्याने वाढत आहेत. मला वाटतं की आपण काही गोष्टींकडे थोडं नम्रता व समानतेनं बघावं. कारण मुलीहींची कुटुंबाप्रती जबाबदारी असतेच. बिलं भरणं, हे फक्त तुमच्या नवऱ्याचं काम नाही. कधीतरी तुमच्या नवऱ्याला म्हणा, पुढचे सहा महिने त्याला सुट्टी आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघा,” असं सोनालीने म्हटलंय.

प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियावर सुसाईड नोट शेअर केल्याने खळबळ; सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या आयुष्यातील सर्व पुरुषांचा मला अभिमान आहे. मला त्यांची काळजी वाटते. जेवण बनवण्याशिवायही कुटुंब किंवा जोडीदारासाठी करता येतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सरकारने एखाद्या क्षेत्रात आरक्षण दिलंय ती वेगळी गोष्टी आहे, ती त्यांची जबाबदारी आहे व ते पार पाडत आहेत. त्याचप्रमाणे काही जबाबदाऱ्या आपल्याही असतात. महिलांनीही त्या जबाबदाऱ्या ओळखण्याची गरज आहे,” असं मत सोनालीने व्यक्त केलं.