scorecardresearch

Premium

“बिअरचे चोरुन दोन घोट घेताच…”; आदिनाथ कोठारेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “बाबांनी मला…”

आदिनाथ म्हणाला “माझ्या मित्रांबरोबर मी दारु घेतली अन्…”

addinath-kothare-mahesh-kothare
आदिनाथ कोठारेने सांगितला पहिल्यांदा दारु प्यायलाचा किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नावं म्हणून अभिनेता आदिनाथ कोठारेला ओळखले जाते. आदिनाथने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मराठीबरोबर बॉलीवूड चित्रपटांमध्येही आदिनाथने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. महाविद्यालयीन काळात आदिनाथने पहिल्यांदा दारू प्यायली होती आणि महेश कोठारेंना हे काळालं होतं. नुकतंच एका मुलाखतीत आदिनाथने त्याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- “मी तुमची पूर्वीपासून चाहती” मिसेस मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ शब्द ऐकताच सुकन्या मोने सुखावल्या; सांगितला ‘वर्षा’वरील अनुभव

Anand Mahindra proud of Class 4 student who helped specially-abled child
आनंद महिंद्रांनी शाळकरी विद्यार्थींनीचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले, “अगदी छोटीशी, साधी गोष्ट पण…”
lalu prasad yadav nitish kumar
Video: ‘नितीश कुमार परत तुमच्याकडे आले तर काय कराल?’ लालू यादव म्हणाले, “ते जेव्हा येतील…”!
Sanjay Raut on Eknath Shinde (3)
“दाढीने काडी केली तर तुमची लंका जळेल”, शिंदेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले “रावणाला…”
Madhavi Mahajani balasaheb thackeray memory
नोकरी करताना झाला त्रास, बाळासाहेब ठाकरेंना कळालं अन्…; गश्मीर महाजनीच्या आईने सांगितला प्रसंग, म्हणाल्या, “मीनाताईही…”

आदिनाथ म्हणाला, “अलिबागमध्ये आमच्या कॉलेजची सहल गेली होती. दिवसभर फिरून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही घराकडे चाललो होतो. मी आणि माझे तीन मित्र आम्ही दारु प्यायचो नाहीत पण त्याबाबत एक कुतुहूल होते. अलिबागला आम्ही ठरवलं की आपण वाईन शॉपमधून दारु घेऊत. मागे आमचे प्रोफेसर होते. म्हणून आम्ही मुद्दाम हळूहळू चालत होतो. म्हणजे सगळे पुढे जातील आणि आपण मागून दारु आणू शकू. पण आमचा प्रोफेसर हुशार होते. ते आमच्या मागेच उभा होता आणि आम्हाला पुढे जायला सांगत होते “

आदिनाथ पुढे म्हणाला, “मी पटापट चालत पुढे गेलो. पुढे जाऊन मी एका माणसाला विचारलं बीच कुठं आहे? आणि वाईन शॉप कुठं आहे? तो विचार करत होता. तोपर्यंत हे मागचे लोक माझ्या जवळ आले होते. आणि तेवढ्यात तो ओरडला बीच इधर है वाईन शॉप उधर है. प्रोफेसर आणि सगळे माझ्याकडे बघत होते. मी गप्प मान फिरवून पुढे निघून गेलो. पण कसंतरी करून आम्ही बिअरची बाटली मिळवली. रात्री सगळे झोपल्यावर आम्ही बसमध्ये आलो आणि दोन दोन बिअरचे घोट घेतले आणि आम्ही निघालो. पण आम्हाला हे माहिती नव्हत बसमध्ये मागच्या बाजूला आमचे एक प्रोफेसर झोपले होते. हे प्रकरण कॉलेजमध्ये पोहोचलं.

हेही वाचा- अभिनय क्षेत्र गाजवणाऱ्या सई ताम्हणकरने युट्यूब चॅनेल का सुरु केलं?, म्हणाली…

“आम्हाला वाटलं आता आम्हाला काढून टाकतील. त्यांनी माझ्या वडिलांना कॉलेजमध्ये बोलवून घेतलं. पण मी अगोदरच त्यांना सगळं सांगितलं होतं. माझे वडील कॉलेजमध्ये आले आणि आमच्या प्रोफेसरांनी त्यांच्याकडे तक्रार केली. माझे वडील म्हणाले मला माहिती आहे त्याने बिअर घेतली आहे. यापुढे मी त्याला समजावून सांगेन.”

हेही वाचा- “कुणी बोलायचं नाही” मराठमोळ्या संगीतकाराच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला, “दारू पिऊन वर्षभरातील सर्व भावना…”

दरम्यान आदिनाथ कोठारेच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर त्याने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे. फक्त मराठी मालिका आणि चित्रपट नव्हे तर बॉलीवूड चित्रपटातही तो झळकला. कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटात तो झळकला. या चित्रपटात त्याने क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारली होती. तसेच ‘पाणी’ हा आदिनाथ कोठारेने दिग्दर्शन केलेला पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याबरोबरच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Adinath kothare revel when he drinking beer for the first time dpj

First published on: 29-09-2023 at 11:26 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×