अभिनेत्री सुकन्या मोने या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तर सध्या त्या त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं सगळीकडे कौतुक झालं. दरम्यान सुकन्या मोने यांनी गणपती बाप्पाबरोबरच आपलं नात कस आहे यावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा- Video : “खोबऱ्याचं सारण, सुंदर कळ्या अन्…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, पाहा व्हिडीओ

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सुकन्या म्हणाल्या, सुकन्या म्हणाल्या, “गणपती बाप्पाची कृपा आहे म्हणूनच माझे एवढे अपघात झाले तरीसुद्धा गेली ४० वर्ष मी सतत काम करत आहे. त्याने मला एकही दिवस घरात बसू दिलेलं नाही. त्याची कृपा आहे म्हणूनच मला कुठेही न जाता कुणाकडे काम न मागता आपणहून समोरुन काम येतं. मला गणपती बाप्पाने छान ठवेलं आहे. माझा सुसंस्कृतपणा माझी जिद्द जी माझ्या आई-वडिलांकडून मला आली आहे ही मला त्यानेच दिली आहे.”

सुकन्या पुढे म्हणाल्या, आपल्या आयुष्यात खूप प्रसंग येत असतात. मानसिक, शाररीकदृष्या आपण खचून जातो पण तरीसुद्धा पुन्हा पुन्हा आपण त्यातून जे उभे राहतो ती जी उर्जा आहे ती आपल्याला श्री गणेशाकडून मिळते.”

सुकन्या यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं रेकॉर्डतोड कमाई केली होती. आता लवकरच त्यांचा ‘इंद्रधनुष्य’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा- Video : “आमच्या घरी गणपती बसत नाही पण…”, क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींना बाप्पाची ओढ; नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

एबीसी क्रिएशन्स निर्मित या चित्रपटात सुकन्या यांच्यासह अभिनेता स्वप्नील जोशी, सागर कारंडे, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त नुकताच करण्यात आला. लंडनमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. एक पुरुष आणि सात बायकांच्या कथानकावर आधारित असलेला हा चित्रपट आहे.

Story img Loader