मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीता प्रार्थना बेहरेचं नाव सामील आहे. मालिका असो अथवा चित्रपट; तिने तिच्या कामाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्रार्थनाही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिच्या कामाबद्दल तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिच्या चाहत्यांना वरचेवर अपडेट्स देत असते. तर आता ती मुंबई बाहेर निसर्गाच्या सानिध्यात कायमची राहायला गेली असल्याचं तिने सांगितलं.

प्रार्थना बेहेरेने नुकताच तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला. तर सध्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी प्रार्थना तिच्या स्वतःच्या या नवीन यूट्यूब चॅनलवरून सर्वांच्या भेटीला येत आहे. या तिच्या चॅनलवर नुकताच तिने एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये तिने ती अलिबागला कायमची शिफ्ट झाल्याचं सांगत तिने त्यांच्या आलिशान घरातील बागेची झलक दाखवली.

आणखी वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

ती म्हणाली, “हे घर मी आणि माझ्या नवऱ्याने खूप प्रेमाने आणि मनापासून बनवलं आहे. त्यामुळे या घरासाठी माझ्या हृदयात एक खास जागा आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला थोडा त्रास झाला. मला वाटायचं की मुंबईत आपलं सगळं काम आहे आणि ते सगळं सोडून अलिबागला कायमचं कसं शिफ्ट व्हायचं? मी हे सगळं कसं सांभाळू शकेन असा मला प्रश्न पडला होता. पण खरं तर हे सगळं सांभाळणं खूप सोपं आहे हे मला नंतर कळलं.”

हेही वाचा : “सेक्सचा विचार करत आहे…”, नेटकऱ्याच्या उत्तराने सोनाली-प्रार्थना थक्क, दोघींनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “आमच्या या घरापासून १५ मिनिटांवर मांडवा आहे. तिथून मुंबईला जाण्यासाठी जेट्टी, बोट्स, रोरो मिळतात. रोरो मध्ये आपण आपली कार टाकून ४५ मिनिटांत मुंबईला पोहोचतो. त्यामुळे इथून मुंबईला पोहोचायला फक्त एक तास लागतो. मुंबईमध्ये ट्राफिकमधून कुठेही जायला साधारण आपल्याला तेवढाच वेळ लागतो त्यामुळे या एका तासाच्या प्रवासाचं फार काही वाटत नाही.” आता प्रार्थनाच हे बोलणं चर्चेत आलं असून या व्हिडिओवर कमेंट करत तिचे चाहते तिला विविध प्रतिक्रिया देत आहेत.