मराठीमधील टॉपची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःला कलाक्षेत्रामध्ये सिद्ध केलं. ती मराठी चित्रपटसृष्टीपुरताच मर्यादित राहिली नाही. तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही सई महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते. कामामुळे सतत चर्चेत असणाऱ्या सईचं खासगी आयुष्यही कोणापासून लपून राहिलेलं नाही. तिच्या रिलेशनशिपबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.

आणखी वाचा – “पडदा व ड्रेस एकसारखाच” म्हणणाऱ्याला सई ताम्हणकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “त्याला…”

सई तिचा कथित बॉयफ्रेंड निर्माता अनिश जोगबरोबरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. अनिशबरोबर तिचं नेमकं नातं काय? याबाबत तिने कधीच उघडपणे भाष्य केलं नाही. पण ‘दौलतराव’ म्हणून ती विविध पोस्ट शेअर करताना दिसते. आताही तिने अनिशबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

फोटोमध्ये सईने अनिशच्या चेहऱ्यावर हात ठेवला आहे. तर दोघंही अगदी गोड हसत आहेत. सई सध्या त्याच्या आठवणींमध्ये रमली आहे. तिने अनिशबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं की, “मला तुझी आठवण येत आहे”. अनिशची आठवण सईला सतावत आहे. या फोटोवरुन पुन्हा तिचं अनिशवर असणारं प्रेम दिसून आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सई ताम्हणकर आणि अनिश जोग एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखतात. अनिशही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे सईबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतो. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे. ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे.