टकाटक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटात प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. याच चित्रपटातील कोमल बोडखे या अभिनेत्रीबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याबद्दल एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

कोमल बोडखे ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतचं तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने सायबर क्राईमची शिकार झाल्याचे सांगितले आहे. इतकंच नव्हे तर तिला काही नंबरवरुन तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली जात आहे. याबद्दल कोमलने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

कोमलने शेअर केलेल्या व्हिडीओत नेमकं काय म्हणाली?

गेल्या काही दिवसांपासून मला एका नंबरवरून फोन येत होते. पण अनोळखी नंबर असल्याने मी तो फोन उचलला नाही. त्यानंतर मग त्यांनी माझ्या भावाला फोन केला. मला माझ्या भावाने मला फोन करून विचारलं की तू कोणत्या अँपवरून पैसे घेतले आहेस का? मी त्याला नाही असं म्हटलं. त्यावर तो म्हणाला की ते लोक तू घेतलेल्या पैशाची मागणी करत आहेत. तसेच ते व्याजही मागत आहे. यावेळी सुरुवातीला मी घाबरले. मग मी त्या नंबरवर फोन केला आणि कोणतंही कर्ज घेतलं नसल्याचे स्पष्ट केले.

त्याबरोबर मी सप्टेंबरपासन घरी नाही नाशिकला आहे आणि माझ्याकडे माझं आधारकार्ड आणि कोणतीही कागदपत्र नाहीयेत. सगळं माझ्या आईवडिलांकडे आहेत. माझा फोनचा डिसप्ले गेल्या महिन्याभरापासून खराब आहे. मी लोन घेतलेलं नाही. असे त्यांना सांगितले.

मी इतकं सर्व सांगितल्यानंतरही ते थांबले नाही. त्यांनी मला माझ्या आधारकार्डचे डिटेल पाठवले. तसेच जर पैसे भरले नाहीत तर तुमचे न्यूड फोटो व्हायरल करु अशी धमकी दिली. मग मात्र मी आणखी घाबरले. मी माझ्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यांनी मला अकाउंट चेक करायला सांगितलं. मी चेक केल्यावर माझ्या एका खात्यात २ हजार पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आल्याचं मला कळालं. पण मी कोणत्याही अँपवरून लोन घेतलंच नव्हतं. शेवटी मी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

गेल्या काही दिवसांपासून हे असे प्रकार इथे सर्रास सुरू आहेत. त्यामुळे कृपया असे कोणतेही अँप डाऊनलोड करु नका. यामुळे तुमचे बँक अकाउंट डिटेल्स त्यांच्याकडे जातील आणि ते लोक याचा गैरफायदा घेतील. तुमची अशी फसवणूक होऊ नये यासाठी सावध राहा, असेही आवाहन तिने याद्वारे केले आहे.

आणखी वाचा : ‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवघ्या महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं कारण आलं समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कोमल बोडके ही टकाटक या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटात तिने अंकिता हे पात्र साकारले होते. या पात्रामुळे ती घराघरात पोहोचली. या चित्रपटात प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत हे कलाकारही झळकले होते.