मराठी चित्रपटसृष्टीत कायमच दर्जेदार विषय हाताळले जातात. ऐतिहासिक, बायोपिक, कौटुंबिक सामाजिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. सिनेअभ्यासक आणि तज्ञ तरण आदर्श यांनादेखील मराठी चित्रपटाची भुरळ पडली आहे. ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या आगामी चित्रपटाचा टीझर त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ हा चित्रपट टीझरवरून तरी एक विनोदी चित्रपट आहे असं दिसतंय. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी. टिझरमध्ये या दोघांमध्येही अनेक खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे आता धोंडी -चंप्या आणि ओवी- आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांचे असून प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ची निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मितीची बाजू सांभाळली आहे.