Met Gala 2025: सध्या जगप्रसिद्ध फॅशन इव्हेंट ‘मेट गाला’ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यंदाचा ‘मेट गाला २०२५’ न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे पार पडला. यावेळी हॉलीवूडसह बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला. शाहरुख खान, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ यांनी यंदा ‘मेट गाला’च्या कार्पेटवर पदार्पण केलं. यावेळी कियाराने आपल्या बेबी बंपसह ‘मेट गाला’च्या कार्पेटवर जबरदस्त एन्ट्री केली. त्यानंतर जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहाना ( Rihanna ) ‘मेट गाला’मध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. रिहानाचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गेल्या वर्षी रिहानाने आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने अनंत अंबानीचं पहिलं प्री-वेडिंग गाजवलं होतं. यासाठी मुकेश अंबानींनी रिहानाला तब्बल ५२ कोटी रुपये दिले होते. हीच रिहाना ( Rihanna ) आता तिसऱ्यांदा आई होणार आहे. ५ मेला झालेल्या ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर रिहाना बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. यावेळी ३७ वर्षी या जगप्रसिद्ध गायिकेने राखाडी रंगाचा टू-पीस आउटफिट घातला होता. ज्यावर काळ्या रंगाचं जॅकेट, फर स्टोल आणि काळ्या रंगाची टोपी अशा लूकमध्ये रिहाना दिसली.
त्यानंतर रिहाना दोन सूट जॅकेट्सने तयार केलेल्या लूकमध्ये पाहायला मिळाली. या लूकमध्ये तिचं बेबी बंप अजून प्रखरपणे दिसत होतं. तिचा हा लूक ‘मेट गाला’ची थीम ‘सुपरफाइन: टेलरिंग ब्लॅक स्टाइल’ याच्याशी जुळत होता. रिहानाचा ( Rihanna ) ‘मेट गाला’मधील या लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Wheeeeere haaaave youuuuu beeeeeeen? @rihanna closes out the carpet pic.twitter.com/iJGqUxBHNg
— The Metropolitan Museum of Art (@metmuseum) May 6, 2025
Rihanna giving @RollingStone a wink at the Met Gala ?
“I can barely wink, but I tried for you!” pic.twitter.com/ibnApPUIJ4This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Fenty Headlines (@FentyHeadlines) May 6, 2025
दरम्यान, ‘मेट गाला’ पूर्वी फोटोग्राफर माइल्स डिग्सने रिहानाचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये रिहाना बेबी बंप फ्लॉन्ट करत पावसात उभी असल्याचं दिसत होती. तिचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता. रिहाना ( Rihanna ) व A$AP रॉकीला दोन मुलं आहेत. RZA ऐथल्स्टन ( ३ वर्षांचा ) आणि रायट रोज ( २१ महिन्यांचा ) आहे. आता रिहाना तिसऱ्यांदा आई होणार आहे, त्यामुळे तिचे चाहते खूप आनंदी आहेत.