मिलिंदने शेअर केला मॉडेलिंग करिअरमधला पहिला फोटो, एका तासासाठी मिळाले होते इतके पैसे

पाहा फोटो…

बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरतो. मिलिंदने त्याच्या करिअरची सुरुवात ही एक मॉडेल म्हणून केली होती. नुकताच त्याने सोशल मीडियावर त्याच्या करिअरमधील पहिल्या मॉडेल फोटोशूटचे फोटो शेअर केले असून त्यावेळी या फोटोशूटसाठी त्याला किती पैसे मिळाले होते हे देखील सांगितले आहे.

मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सर्वात पहिल्या मॉडेल फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. ‘१९८९ साली मी सर्वात पहिल्या जाहिरातीसाठी शूट केलं होतं. त्यापूर्वी मला मॉडेलिंगमध्ये करिअर करता येतं हे देखील माहिती नव्हते. माझ्यासाठी तो सरप्राइज फोन कॉल होता. एका व्यक्तीने मला कुठे तरी पाहिले होते आणि त्याच्यासाठी फोटोशूट करावं असं तो म्हणाला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

पुढे मिलिंद म्हणाला, ‘त्यावेळी मी सर्वांशी बोलायला लाजायचो. पहिले मी मला जमणार नाही असे म्हटले. पण जेव्हा मला एक तासासाठी ५० हजार रुपये ऑफर करण्यात आले तेव्हा मी तयार झालो. Rasna Behlचे आभार.’

मिलिंद सोमणने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती. त्यानंतर तो एक अभिनेता म्हणून लोकप्रिय ठरला आहे. मिलिंदने मालिकांमध्येही काम केले आहे. रूल्स प्यार का सुपरहिट फॉर्मुला, जुर्म, बाजीराव मस्तानी आणि चेफ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Milind soman shares photos from first modelling assignment in 1989 avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या