नागराज मंजुळेंचं सूत्रसंचालनाबरोबरच गायनातही पदार्पण

कागर, नाळसारख्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या नव्या दमाच्या ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी हे गाणं संगीतबध्द केलं आहे.

nagraj manjule
नागराज मंजुळे

प्रश्नाला डरला

पडला रे पडला

प्रश्नाला भिडला

जिंकला रे जिंकला,

आणि म्हणूनच जग म्हणतं उत्तर शोधलं की जगणं बदलतं! हे शब्द आहेत सोनी मराठीवर येणाऱ्या कोण होणार करोडपतीच्या टायटल ट्रॅकचे. सोनी मराठीवर येणाऱ्या कोण होणार करोडपती?, या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवलं आहे. आपल्या आयुष्याची वाट चालताना अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं कळत-नकळत शोधत असतो. ज्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशीलअसतो, अशा प्रश्नांची उत्तरं सापडली की आयुष्याला एक वेगळंच वळण लागतं. असेच काहीसे प्रश्न सोनी मराठीवर येणाऱ्या कोण होणार करोडपती? या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, तुमची स्वप्न पूर्ण करायला मदतीचा हात देणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची हीच खरी वेळ असल्याचं नागराज मंजुळे नुकत्याच लाँच झालेल्या गाण्यातून सांगत आहेत.

या गाण्याची गंमत म्हणजे कोलंबस आणि गणपत वाणी या दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींचा उल्लेख रंगा गोडबोले यांनी खूप सुंदररित्या केला आहे. असून याला आवाज ही दिला आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ए. व्ही. प्रफुलचंद्रसोबत नागराज मंजुळेंनी हीकागर, नाळसारख्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या नव्या दमाच्या ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी हे गाणं संगीतबध्द केलं  या गाण्याला आवाज दिला आहे. त्यामुळे यंदाच्या कोण होणार करोडपती? मधून नागराजच्या चाहत्यांना त्याचे दोन नवे पैलू पाहायला मिळतील, असं म्हणायला हरकत नाही.

थोडक्यात काय तर हातावर हात धरून बसल्याने आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत तर त्यासाठी आपण त्या स्वप्नांपर्यंत जाणाऱ्या वाटा शोधणं गरजेचं असतं, या आशयाचं हे टायटल ट्रॅक कोण होणारकरोडपती? च्या मंचाकडे तुम्हाला आमंत्रित करतंय, एवढं नक्की.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nagraj manjule sing a song for kon honar crorepati

ताज्या बातम्या