scorecardresearch

वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारताच संतापल्या नुसरत जहाँ, म्हणाल्या “माझे लग्न…”

नुसरत जहाँ या अनेकदा बॉयफ्रेंड आणि अभिनेता यश दासगुप्तासोबतच्या नात्याबद्दल विविध खुलासे करताना दिसतात.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुसरत जहाँ या त्यांच्या राजकीय कारकिर्दीसह अभिनय आणि वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत आहेत. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. नुसरत जहाँ या अनेकदा बॉयफ्रेंड आणि अभिनेता यश दासगुप्तासोबतच्या नात्याबद्दल विविध खुलासे करताना दिसतात. यावेळी तिने तिच्या मुलाच्या वडिलांचे नाव का उघड केले नाही? याबाबत तिने स्पष्टीकरण दिले आहे.

नुसरत जहाँ यांनी नुकतंच इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांना बाळाच्या वडिलांचे नाव सुरुवातीला उघड न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की “भारतातील काही कायद्यांनुसार मला काही प्रश्नांची उत्तरे न देण्याचा अधिकार आहे.”

नुसरत जहाँ यांनी बॉयफ्रेंड आणि अभिनेता यश दासगुप्तासोबतच्या नात्यासोबतचा खुलासा केल्यानंतर अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकतंच विकिपीडियाने यश दासगुप्ताच्या नावापुढे ‘डोमॅस्टिक पार्टनर (domestic partner)’ असे केले होते. यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, ‘तुम्हाला हा शब्द बदलण्याची इच्छा आहे का?’ त्यावर त्या म्हणाल्या की, ‘अजिबात नाही. मी असे का करु. आता आम्ही एक कुटुंब आहोत,’ असे उत्तर देत त्या हसायला लागल्या.

मात्र यावेळी तिला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारण्यात आले. यावेळी लग्नाबद्दल लोकांचे प्रश्न फेटाळून लावत त्या म्हणाल्या की, ‘मला माझ्या लग्नाबद्दल बोलायचे नाही. माझ्या लग्नावर बोलू नका. पण माझे लग्न झालेले नाही, याची तुम्हाला काय माहिती आहे.’

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

दरम्यान नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी एकमेकांशी लग्न केलंय की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून तर त्या दोघांनी लग्न केलं आहे असं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी नुसरतनं इन्स्टाग्रामवर एक केकचा फोटो शेअर केला होता. ज्यावर ‘पती आणि वडील’ असं लिहिलं होतं. याशिवाय तिचा मुलगा इशानच्या जन्म प्रमाणपत्रावरही यशचं नाव आहे. तिच्या डिलिव्हरीच्या वेळीही यश तिच्यासोबत राहून तिची काळजी घेताना दिसला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nusrat jahan says she and yash dasgupta are family asks how do you know i am not married nrp