‘ओटीटी’ला गुडबाय

भारतात गेल्या दीड वर्षात ओटीटीची बाजारपेठ प्रचंड फोफावत चालली आहे. अनेक कलाकारांना या माध्यमामुळे कामाच्या संधी उपलब्ध होत आहेत

गुणात्मकतेपेक्षा गुणसंख्येला महत्त्व यायला लागले की कोणत्याही गोष्टीचा दर्जा घसरत जातो. सध्या ‘ओटीटी’ वाहिन्यांचा भारतातील पसारा इतका झपाट्याने वाढतो आहे की इथेही आशयाचा विचार करत रिमोट हातात घेऊनच निवड करावी लागणार आहे, असे अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मध्यंतरी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्याचीच प्रचीती सध्या अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीने ओटीटी सोडण्याची भावना व्यक्त के ली त्यातून येते आहे. ओटीटीवर सध्या ढिगाने उपलब्ध होणाऱ्या आशयाला कचराकुं डीची उपमा देत आशयनिर्मितीचा वाढत चाललेला फु गा आणि घसरत चाललेला  दर्जा यामुळे आपल्याला यापुढे ओटीटीचा भाग व्हायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका नवाझने घेतली आहे.

भारतात गेल्या दीड वर्षात ओटीटीची बाजारपेठ प्रचंड फोफावत चालली आहे. अनेक कलाकारांना या माध्यमामुळे कामाच्या संधी उपलब्ध होत आहेत. एकीकडे या माध्यमाकडे वरदान म्हणून पाहिले जात असताना नवाझुद्दीन सिद्दिकीसारख्या अभिनेत्याने केलेल्या विधानालाही तेवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. याचे कारण म्हणजे या माध्यमावर येणारा आणि प्रसिद्ध झालेला पहिला भारतीय कलाकार म्हणून नवाझुद्दीन सिद्दिकीची ओळख आहे. आणि आता तोच या माध्यमाकडे पाठ वळवतो आहे. ‘सेक्रेड गेम्स’ या ‘नेटफ्लिक्स’ वाहिनीवर २०१८ साली प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित आणि लोकप्रिय वेबमालिकेतून नवाझला प्रचंड ओळख आणि लोकप्रियता मिळाली होती.  आता त्यानेच ओटीटीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ओटीटीचा चेहरा’ म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तसेच १९० देशांमध्ये आपल्या ‘घूमकेतू’, ‘सिरियस मेन’, ‘फोटोग्राफ’, ‘सेक्रेड गेम्स? २’ यांसारखे वेबपट आणि वेबमालिकांमधून झळकलेला नवाझुद्दीनच्या ओटीटी सोडण्याच्या निर्णयाबद्दल सगळ्यांनाच आश्चार्य वाटते आहे.

आपल्याकडे एकतर अशा वेबमालिकांची निर्मिती के ली जाते आहे ज्या खरंतर दाखवण्याची गरजच नाही किं वा असे सिक्वल्स लादले जात आहेत ज्यातून नवे सांगण्यासारखे काही उरलेले नाही. निर्मात्यांना केवळ अशा अनिर्बंध वेबमालिकांसाठी पैसे मिळत आहेत, असे नवाझुद्दीन म्हणणे आहे. ओटीटीसारख्या नव्या डिजिटल माध्यमावर काम करण्याची उत्सुकता आणि त्यातील आव्हान जे आपण सुरुवातीला अनुभवले होते, ते आता संपुष्टात आले आहे, असे तो म्हणतो. जर मी स्वत:च या वेबमालिका पाहू शकत नाही, तर त्याचा भाग कसा होऊ शकतो?, असा प्रश्नही त्याने उपस्थित के ला आहे. आपण यापुढे चित्रपट करतच राहणार, पण वेबमालिका करणार नाही अशी स्पष्ट भूमिका नवाझने घेतली आहे.

ओटीटी माध्यमावर चांगलेही कलाकार आहेत, मात्र तथाकथित तारांकित इथेही येऊन बक्कळ पैसा कमावत आहेत. करोना-टाळेबंदीमुळे आलेल्या या डिजिटल माध्यमाच्या वर्चस्वाच्या आधीही कित्येक तारेतारका त्यांचे चित्रपट देशभरातील ३००० थिएटरमधून प्रदर्शित करत होते. तेव्हा लोकांना त्यांना पाहण्याशिवाय पर्याय नव्हता, पण आता त्यांच्याकडे अमर्याद पर्याय आहेत. या तारांकित व्यवस्थेने मोठ्या पडद्याला कमकु वत के लं आहे, तशीच अवस्था नव्या माध्यमाचीही होऊ नये, अशीही भीती त्याने अप्रत्यक्षरित्या व्यक्त के ली आहे. त्याच्या या भूमिकेने एकू णच ओटीटी विश्वात खळबळ उडाली आहे हे नक्की. के वळ ओटीटीच्या विस्तारत जाणाऱ्या बाजारपेठेबद्दल बोलत राहणाऱ्या आणि गुणात्मक आशयनिर्मितीकडे कानाडोळा करणाऱ्यांना नवाझच्या या स्पष्टवक्ते पणाने चपराक मिळाली आहे.

‘ओटीटी’ म्हणजे सध्या नुसता निर्मितीचा धंदा झाला आहे. ओटीटीवरील आशयनिर्मितीचा गुणात्मक दर्जा घसरत चालला आहे. ओटीटी म्हणजे अनावश्यक आशयनिर्मिती असलेल्या वेबमालिकांची कचराकुंडी झाली आह. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइमसारख्या आंतरराष्ट्रीय ओटीटी कंपन्या वेबमालिका किं वा वेबपटांच्या निर्मितीसाठी बक्कळ पैसा देतात. याचा फायदा घेत फक्त ढिगाने वेबमालिका बनवून कमावण्याचे निर्मात्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

नवाझुद्दीन सिद्दिकी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ott goodbye the importance of quality over quality declining standards ott channels spread across india akp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या