Watch These 4 Movies With Family This Diwali : दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झालं आहे. सणावारांच्या दिवशी अनेक जण त्यांच्या जवळच्या माणसांना भेटतात. कुटुंब एकत्र येतात, त्यामुळे अशावेळी कुटुंबाबरोबर एकत्र पाहता येतील अशा काही धमाल चित्रपटांची नावं तुम्हाला सांगणार आहोत, जे बघताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असेल.

कुटुंबाबरोबर एकत्र पाहता येणारे चित्रपट कुठे पाहू शकता आणि ते चित्रपट कोणते आहेत जाणून घ्या…

दिवाळीत कुटुंबाबरोबर पाहे ‘हे’ चित्रपट

३ इडियट्स आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अनेकांनी पाहिलाच असेल. पण, हा चित्रपट एकदा नाही तर पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा आहे. आमिर खानने त्याच्या विनोदीशैलीने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट तुम्ही ‘अमॅझॉन प्राइम’ आणि ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता.

लुडो – अनुराग बासू दिग्दर्शित ‘लुडो’ चित्रपट परफेक्ट फॅमिली ड्रामा आहे, जो पाहून तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर पोट धरून हसाल. अभिषेक बच्चन, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट तुम्ही ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता.

गोलमाल अगेन – कॉमेडी चित्रपटांना पसंती देणारे या चित्रपटाचा अनेकदा उल्लेख करतात. ‘गोलमाल’च्या फ्रेंचाइजीचा मोठा चाहतावर्ग आहे. दिवाळीत तुम्ही हा चित्रपट तुमच्या कुटुंबाबरोबर एकत्र बसून पाहू शकता. अजय देवगण, श्रेयस तळपदे, परिणीती चोप्रा, तब्बू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट तुम्ही ‘हॉटस्टार’वर पाहू शकता.

छिछोरे श्रद्धा कपूर व सुशांत सिंह राजपूत यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. कॉलेजमधील मित्रांची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळते; तर श्रद्धा व सुशांत यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा लक्ष वेधून घेते. हा चित्रपट तुम्ही ‘हॉटस्टार’वर पाहू शकता.