अभिनेते नाना पाटेकर अभिनयाच्या बरोबरीने आपल्या रोखठोक मतांमुळे चर्चेत असतात. तसेच ते उत्तम स्वयंपाक करतात. त्यांचे जेवण बनवतानाचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येतात. सध्या ते चर्चेत आले ते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत तसेच एका मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेकमध्ये ते दिसणार आहेत.

ओटीटी माध्यमावर आज अनेक अभिनेते पदार्पण करत आहेत. सामाजिक विषयांना वाचा फोडणारे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी वेबसीरिज ते आता नाना पाटेकर काम करणार आहेत. लाल बत्ती असे या वेब सीरीजचे नाव असून नाना पाटेकर दोन वर्षानंतर पडद्यावर झळकणार आहेत. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याबरोबर नाना पाटेकर यांनी ‘अपहरण’, ‘राजनीती’ हे दोन चित्रपट केले आहेत.

इथे कोणी पाकिस्तानचा…”; बंगळूरमधील कार्यक्रम रद्द झाल्यानंतर वीर दासचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

माध्यमांच्या माहितीनुसार मेघना मलिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टीव्ही क्षेत्रातील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने याआधी मिर्जापुर, अरण्यक आणि बंदिश बॅंडिट्स यांसारख्या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. ती यात नानांच्या पत्नीची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. ही वेबसीरिज राजकारणावर आधारित असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्दर्शक प्रकाश झा यांनी आजवर ‘गंगाजल’, ‘मृत्युदंड’, ‘अपहरण’ आणि ‘चक्रव्यूह’ सारखे चित्रपट बनवले आहेत. त्यांची ‘आश्रम’ वेबसिरीज चांगलीच गाजत आहे. ‘गंगाजल २’, ‘सांड की आंख’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला आहे. प्रकाश झा मूळचे बिहारचे आहेत. तीन दशकाहून अधिक ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत.