वाढदिवसानिमित्त अंकिताची जोरदार पार्टी; सोशल मीडियावर पुन्हा झाली ट्रोल

या पार्टीला संदिप सिंहला बोलावणं चुकीचं असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं १९ डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त अंकिताने तिच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र याच कारणावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन झालं असताना स्वत: वाढदिवसानिमित्त पार्टी करणं आणि या पार्टीला संदिप सिंहला बोलावणं चुकीचं असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

वाढदिवसाच्या रात्री आणि संध्याकाळी अशा दोन वेळी सेलिब्रेशन करण्या आलं. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पार्टीमध्ये संदिप सिंहची हजेरी पाहायला मिळाली. मात्र अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये संदिप कुठेच दिसला नाही. अंकिताने जाणूनबुजून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले नाहीत, असाही आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

 

सुशांतच्या आत्महत्येनंतर संदिप सिंहची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यावेळी संदिप सिंह सुशांतसोबत फ्लॅटमध्ये होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताच्या वाढदिवसाच्या पार्टीला तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसुद्धा उपस्थित होता. याशिवाय विकास गुप्ता, रश्मी देसाई, अपर्णा दीक्षित असे काही इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणीसुद्धा होते. याआधीसुद्धा दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. ‘सुशांतला इतक्या लवकर विसरलीस का’, असा सवाल नेटकऱ्यांनी तिला केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pavitra rishta actress ankita lokhande slammed for partying and inviting sandip singh on her birthday ssv