Race 3 collection : २०० कोटींची शर्यत जिंकेल का ‘रेस ३’?

Race 3 collection : चित्रपट प्रदर्शित होऊन ९ दिवस झाले आहेत, अद्यापही या चित्रपटाची गाडी १५० कोटींवर अडकली आहे.

race-3
'रेस ३'

Race 3 collection सलमान खानच्या ‘रेस ३’ चित्रपटानं तीन दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमावला. सर्वात कमी वेळात १०० कोटींचा गल्ला जमावणारा तो या वर्षांतला ‘पद्मावत’नंतरचा दुसरा चित्रपट ठरला आहे. बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाविषयी समीक्षकांनी फार चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या. हा चित्रपट तर सोशल मीडियावर अक्षरश: ट्रोलिंगचा विषय ठरला होता. पण, अल्पावधित बक्कळ कमाई करत सलमानच्या चित्रपटाची २०० कोटीच्या दिशेनं घोडदौड सुरू झाली होती. पण चित्रपट प्रदर्शित होऊन ९ दिवस उलटले मात्र २०० कोटींचा टप्पा कमी वेळात पार करण्यात चित्रपट अपयशी झाल्याचं दिसून येत आहे.

आठवड्याच्या दुसऱ्या शनिवारी या चित्रपटानं ५.५० कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंतची या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कमाई १५१ कोटी एवढी झाली आहे. ईदला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटानं १०३ कोटींची विक्रमी कमाई केली होती. ज्या वेगात या चित्रपटानं १०० कोटींचा पल्ला गाठला त्याच वेगात हा चित्रपट २०० कोटीही सहज कमावेल असा अंदाज बांधण्यात आला होता.

पण अद्यापही चित्रपटाची गाडी १५१ कोटी भोवतीच अडकली आहे. या आठवड्यात बहुप्रतिक्षीत ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे अर्थातच सलमानच्या चित्रपटाला तीव्र स्पर्धा असणार आहे. याचा थेट परिणाम सलमानच्या ‘रेस ३’ वर होऊ शकतो त्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत ‘रेस ३’ चित्रपट २०० कोटींची शर्यत पार करण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Race 3 day 9 collection fails to cross the 200 crore