दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. येत्या ११ मार्चला त्याचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या प्रभास आणि ‘राधे श्याम’ची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात प्रभासनं बरेच रोमँटीक सीन दिले आहेत. यावर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं भाष्य केलं. हे सर्व सीन त्यानं कसे शूट केले याविषयी त्यानं सांगितलं.

प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या ‘राधे श्याम’मध्ये मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात या दोघांचे बरेच रोमँटीक सीन आहेत. यावर बोलताना प्रभासनं सांगितलं, ‘बरेचदा मी अशाप्रकारचे सीन करणं टाळतो. पण जेव्हा कथेची गरज असते तेव्हा मात्र हे सीन टाळता येत नाही. ‘राधे श्याम’च्या वेळीही असंच काहीसं घडलंय.’ प्रभास त्याच्या टोन्ड बॉडीसाठी देखील ओळखला जातो. मात्र ऑनस्क्रीन शर्टलेस होणं त्याला आवडत नाही.

आणखी वाचा- प्रसिद्धीसाठी मुलीला दत्तक घेतलं म्हणणाऱ्यांना सनी लिओनीचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

प्रभास जेव्हा कॅमेरासमोर लिपलॉक किंवा कोणताही किसिंग सीन करत असतो त्यावेळी सेटवर फार कमी लोक असवेत असा त्याचा प्रयत्न असतो. पिंकव्हिलाशी बोलताना तो म्हणाला, ‘ही कथाच अशाप्रकारे लिहिली गेली आहे आणि ही एक लव्हस्टोरी आहे. त्यामुळे मी अशाप्रकारच्या सीनला नकार देऊ शकलो नाही. व्यावसायिक चित्रपटांमध्ये आपण असे सीन टाळू शकतो पण लव्ह स्टोरीमध्ये असं करता येत नाही.’

आणखी वाचा- हृतिक रोशन आजारी गर्लफ्रेंडची अशी घेतोय काळजी, सबा आझादनं शेअर केला फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभासनं या मुलाखतीत सांगितलं, ‘आजही मला किस, लिपलॉक सीन किंवा शर्टलेस सीन करताना सहजता जाणवत नाही. माझ्या आसपास किती लोक आहेत हे मी अगोदर पाहतो आणि मग आपण हा सीन दुसरीकडे कुठे शूट करू शकतो हे विचारतो. राजामौली सरांनी मला ऑनस्क्रीन शर्टलेस होण्यास सांगितलं होतं आणि ते मी हे देखील करू शकतो हा विश्वास त्यांनीच मला दिला होता.’ दरम्यान प्रभासच्या ‘राधे श्याम’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.