छोट्या पडद्यावरील कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. प्रोफेशनल लाईफसोबतच रश्मी तिच्या पर्सनल लाईफमुळेदेखील तितकीच चर्चेत असते. रश्मी आणि तनुज विरवानी मुख्य भूमिका असलेली ‘तंदुर’या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. रश्मीला तिच्या पलक या भूमिकेसाठी प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. रश्मीने एका मुलाखतीत तिच्या करियरबद्दल आणि तिला पुढे कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे? ते सांगितले आहे.
रश्मीला एका मुलाखतीत जेव्हा विचारण्यात आले की ती आता कोणत्या गोष्टींवर फोकस करणार आहे. त्यावर ती म्हणाली की तिने तिच्या करियरची सुरवात प्रादेशिक चित्रपटातुन केली, मग कालांतराने तिने टीव्ही सृष्टीत पदार्पण केले आणि आता ती वेब सीरिजसाठी काम करते आहे. “मला कोणत्या एका माध्यमात अडकून नाही रहायचे…”असे तिने त्या मुलाखतीत सांगितले. “मला जे काम करायची इच्छा होइल, त्यात मला काम करायचे आहे.” हे ही तिने स्पष्ट केले.
View this post on Instagram
रश्मी देसाईने पुढे म्हणालीकी तिचे काही काही भूमिका साकारण्याची तिची इच्छा आहे. आणि आता तिला वास्तववादी पात्र साकारण्याची इच्छा आहे. निवडक भूमिका करेल, ज्याच्याशी ती कनेक्ट करूशकेल. खलनायिका, ग्रे शेड्स ते प्रेमळ सुने पर्यंतच्या भूमिका रश्मीने भूमिका साकारल्या आहेत. मात्र तिला ग्रे शेड्स असलेल्या भूमिका साकारायला जास्त आवडेल असे तिने सांगितले. ती पुढे म्हणते की “मी आधी ज्या चुका केल्या त्याची पुनरावृत्ति करणार नाही . त्यामुळे आता तिला वास्तववादी भूमिका साकारायच्या इच्छा आहे.
२००२ मध्ये ‘कन्यादान’ या मालिकेच्या माध्यमातून रश्मीने कलाविश्वात पदार्पण केले. तिला ‘उतरन’ या मालिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली. नंतर ‘उतरन’ मालिकेतील अभिनेता नंदिश संधूसोबत रश्मी लग्न बंधनात अडकली. त्यांच्या आपसांतल्या मतभेदांमुळे २०१२ साली ते विभक्त झाले. ‘दिल से दिल तक’ आणि ‘नागिन’या रश्मी देसाईच्या गाजलेल्या मालिकांपैकी दोन मालिकाआहेत.