अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी म्हणून ओळखली जाते. १० वर्षांपूर्वी त्यांनी ‘माई नेम इज खान’ नावाच्या एका चित्रपटात एकत्र काम केले होते. २०१० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज पुन्हा एकदा चर्चेत आहे. हा चित्रपट शाहरुख काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा अर्जन औजलामुळे चर्चेत आला आहे.
अवश्य वाचा – नेहा कक्कर संतापली; लगावली सहकलाकाराच्या कानशीलात
अवश्य पाहा – ‘या’ श्रीमंत अभिनेत्रीसमोर शाहरुख खानही वाटतो गरीब
अवश्य पाहा – जन्माने पुरुष असलेल्या अभिनेत्री
अर्जनने ‘माई नेम इज खान’मध्ये समीर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यावेळी तो १२ वर्षांचा होता. या चित्रपटात तो शाहरुख आणि काजोलचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या भोवतीच चित्रपटाचे कथानक फिरते. आज हा १२ वर्षाचा मुलागा २२ वर्षांचा झाला आहे. अर्जनने अलिकडेच त्याचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. या फोटोंच्या निमित्ताने ‘माई नेम इज खान’ आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसी नाईकच्या अदा पाहून व्हाल फिदा
‘माई नेम इज खान’ हा चित्रपट शाहरुखच्या वादग्रस्त चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर याने केले होते. त्यावेळी पहिल्या तीन आठवड्यात या चित्रपटाने ७० कोटी रुपयांची कमाई केली होती.