गेल्या काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण यावर सायलीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या आयपील सुरु आहे आणि ऋतुराजचा खेळ पाहून अनेकांनी सायली संजीवच्या पोस्टवर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नईचा ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने २७ चेंडूत ३२धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आहे. त्यानंतर सायली संजवीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा : ‘वडिलांचे नाव खराब होणार नाही ना…’, परेश रावल यांनी दिली आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया

सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये सायली सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा फोटो चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. काहींनी ऋतुराजवरुन देखील कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘काल तुमच्या ह्यांनी ट्रॉफी जिंकली’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरने ‘ऋतु का राज’ असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलमध्ये खेळल्या गेल्या १६ सामन्यात ऋतुराज गायकवाडने ६३५ धावा केल्या आहेत. या खेळीत १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकूण ६४ चौकार आणि २३ षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.