बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अलीकडेच, त्याच्या दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीसोबत (Atlee) या चित्रपटाचे नाव आणि टीझर समोर आला. ‘जवान’ (Jawan) असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra), सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) आणि साऊथ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) देखील दिसणार आहेत. पण मेकर्सची पहिली पसंत नयनतारा नसून समंथा रुथ प्रभूला कास्ट करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, नागा चैतन्यमुळे तिने स्वत:ला चित्रपटाला नकार दिला असे म्हटले जाते.

काही महिन्यांपूर्वी अशी अफवा पसरली होती की २०१९ मध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटासाठी समंथाशी संपर्क साधण्यात आला होता, परंतु तिने ही ऑफर नाकारली होती. ‘मिड-डे’ मधील एका वृत्तानुसार, असे म्हटले जाते की समांथाने तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यसोबत कौटुंबिक सहलीला जाण्याची योजना केली होती. यासोबतच त्या दोघांनी फॅमिली प्लॅनिंग करणार होते यामुळे समांथाने चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर निर्मात्यांनी नयनताराला या चित्रपटात घेतलं.

आणखी वाचा : “जॉनी डेपला ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई देऊ शकत नाही…”, एम्बर हर्डच्या वकिलाचे वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : “असा चित्रपट करताना लाज वाटली पाहिजे…”, ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटावरून केआरकेने केली अक्षय कुमारवर टीका

हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडा भाषेत प्रदर्शित होणार आहे. दाक्षिण भारतात असलेल्या शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

आणखी वाचा : अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगत रितेश देशमुख, म्हणाला “मामांसोबत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खान सगळ्यात शेवटी ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस यशस्वी होऊ शकला नाही. आता शाहरुख लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.