बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा काल म्हणजे २ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. त्याचा हा बर्थडे थोडा जास्तचं विशेष होता. कारण वाढदिवसाच्या काही दिवसांआधीच त्याचा मोठा मुलगा आर्यनचा सुटका मिळाली आणि तो मन्नतवर परतला होता. शाहरुखला त्याच्या वाढदिवसानिमित्ताने सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, यंदाच्या वर्षी अशी गोष्ट घडली आहे जी आता पर्यंत शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी घडली नाही.

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही शाहरुखचे लाखो चाहते मन्नतच्या समोर येऊन उभे होते. त्यांना आशा होती की शाहरुख बाहेर येईल आणि त्याच्या वाढदिवशी त्याची एक झलक त्यांना पाहायला मिळेल. मात्र, यंदाच्या वर्षी शाहरुख चाहत्यांना त्याच्या वाढदिवशी भेटलाच नाही. इतक्या वर्षात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. जेव्हा पासून शाहरुखला लोकप्रियता मिळाली आहे, तेव्हा पासून शाहरुख प्रत्येक वाढदिवसाला मन्नतच्या बाहेर येऊन चाहत्यांचे आभार मानतो.

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

दरम्यान, असे म्हटले जाते की शाहरुख आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे अलिबागमध्ये असलेल्या त्यांच्या बंगल्यावर आहेत. एवढंच नाही तर ते त्यांना यंदाचा वाढदिवस देखील साजरा केला नाही. तो त्याच्या कोणत्याही मित्रांशी देखील बोलला नाही. तर शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानीने पोलिस अधिकाऱ्यांना मन्नत समोर असलेल्या चाहत्यांना यंदा शाहरुख त्यांना भेटू शकणार नसल्याने जाण्यास सांगा असे सांगितले.

आणखी वाचा : शाहरुखच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्ताने मुलगी सुहानाने केला ‘हा’ खास फोटो शेअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखने २ नोव्हेंबर रोजी त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा केला आहे. तर शाहरुखला त्याच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांशी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्याच्या लेकीने म्हणजेच सुहानाने दिलेल्या शुभेच्छांनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.