बॉलिवूडचा किंग खान म्हणून अभिनेता शाहरुख खान ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख चित्रपटसृष्टीपासून लांब असला तरी सतत चर्चेत असतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. याचे एक उदाहरण काही दिवसांपूर्वीच आपण पाहिले. काही दिवसांपूर्वी एका महिलेने ट्वीट केले होते की शाहरुखच्या देशातून आहेस, असं म्हणतं इजिप्तच्या एका व्यक्तीने तिला मदत केली होती. इजिप्तमधील त्या व्यक्तीला आता शाहरुखने एक भेट वस्तू पाठवली आहे.

खरतर, सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे ट्वीट अश्विनी देशपांडे या मराठमोळ्या महिलेचे होते. त्यांना ‘इजिप्तमधील एक ट्रॅव्हल एजंटला पैसे ट्रान्सफर करायचे होते. पण ट्रान्सफर करण्यासाठी अनेक समस्या येत होत्या. तेव्हा तो एजंट म्हणाला, “तू शाहरुख खानच्या देशातील आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी तुझे बुकिंग घेतो. तू मला नंतर पैसे दे. मी सहसा असे काही करत नाही पण शाहरुखने आमच्यासाठी जे काही केले आहे. त्यामुळे शाहरुखसाठी काहीही” या आशयाचे ट्वीट त्या महिलेने केले होते.

आणखी वाचा : “…कारण माझे ब्रेस्ट मोठे नाहीत”, नीना गुप्ताच्या उत्तराने कपिल शर्माची बोलती बंद

अश्विनी यांचे हे ट्वीट पाहिल्यानंतर शाहरुखने त्यांना एक ऑटोग्राफ फोटो आणि पत्र पाठवले आहे. याविषयी आता त्यांनी ट्वीट केले आहे. माझ्या या कथेचा खूप आनंददायी शेवट झाला आहे. शाहरुखने साइन केलेले ३ फोटो आज आले, एक इजिप्तच्या ट्रॅव्हल एजंटसाठी, एक त्याच्या मुलीसाठी आणि एक माझ्यासाठी, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर अश्विनी यांनी ट्वीटच्या शेवटी शाहरुख आणि त्याची सेक्रेटर पूजाचे आभार मानले आहे.

आणखी वाचा : “माझ्या भावांनी हिंदूशी लग्न केले”, मानहानीच्या दाव्यावर सलमानच्या वकीलांनी दिली उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख हा २०१८मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर शाहरुखने चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला. आता लवकरच तो ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.