Viral Video: सोनू सूदने सुरू केला पंजाबी ढाबा; म्हणाला, “साहेब चपाती तयार आहे…”

नुकतंच सोनू सूदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमधला त्याचा नवा अंदाज फॅन्सच्या पसंतीस पडत आहे.

Sonu-Sood-2

सोनू सूद एक असा अभिनेता आहे ज्याने ऑनस्क्रीन तर खलनायकाच्या भूमिका साकारल्या, पण रिअल लाइफमध्ये तो एका सुपरहीरोपेक्षा सुद्धा काही कमी नाही. करोना काळात ‘गरीबांचा मसिहॉं’ बनत लोकांची मदत केली. सध्या तर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकांच्या ओठांवर त्याचंच नाव येत असतं. करोना काळात लोकांच्या मदती व्यतिरिक्त तो आपल्या अनोख्या अंदाजामुळे चर्चेत येत असतो. कधी तो सुपरमार्केट सुरू करताना दिसून येतो, तर कधी रिक्षा चालवताना दिसून येतो. असंच काहीसं पुन्हा एकदा झालंय. नुकतंच सोनू सूदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमधला त्याचा नवा अंदाज फॅन्सच्या पसंतीस पडत आहे.

तुम्ही कधी गेला आहात का सोनू सूदच्या ढाब्यावर?

होय, हे खरंय…सोनू सूदचा व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सोनू सूद आपला ढाबा सुरू करत असताना दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये तो चपाती बनवत असताना दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये सोनू सूद म्हणतो, “साहेब, चपाती तयार आहे…प्रसिद्ध आहे सोनू सूदचा ढाबा…यापूर्वी पंजाबमध्ये सुरू केलेला…त्यावेळी तंदूर लहान होत्या…म्हणून चपाती स्वस्त होती..पण यावेळेला चपाती महाग झाली आहेत. बॉस, सध्या शिकतोय….एकदा जर तुम्ही सोनू सूदच्या हातची चपाती खाल्ली तर इतर दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी तुम्ही चपातीसाठी जाणार नाही…हे मात्र नक्की. आम्ही खूप फास्ट चपाती बनवतो. म्हणूनच लवकरात लवकर पंजाबच्या मोगेंची चपातीचा आस्वाद घ्या.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

बड्या प्रोजेक्ट्सवर काम करतो सोनू सूद

अभिनेता सोदू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच त्याने ‘किसान’ चित्रपट साइन केलाय. याशिवाय तो लवकरच ‘पृथ्वीराज’ चित्रपटात झळकणार आहे. तसंच तो फराह खान सोबत म्यूझिक व्हिडीओसाठी देखील काम करतोय. कदाचित त्याच्या वाढदिवशी म्हणजेच येत्या ३० जुलै रोजी हा म्यूझिक व्हिडीओ रिलीज होऊ शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sonu sood opened punjabi dhaba said last time it was cheap now rotis are expensive prp