दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. त्यानंतर आता अल्लू अर्जुनचा आणखी एक चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून सध्या चर्चेत आहे.

अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठापुरामुलू’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगू भाषेतील असून आता हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २६ जानेवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्यांनी, ‘अल्लू अर्जुनच्या अला वैकुंठापुरामुलू चित्रपटाचा हिंदी टीझर प्रदर्शित’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
‘घटस्फोट हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी असू शकतो’, धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर अभिनेत्याचे विधान

अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरामुलू’ हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘बुट्टा बम्मा’ हे गाणे सुपरहिट ठरले होते. अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरामुलू’ हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो सुपरहिट ठरला होता.

सध्या ‘अला वैकुंठापुरमलू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक अभिनेता कार्तिक आर्यन करत आहे. कार्तिक आर्यनला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनने हा चित्रपट त्याच्या हृदयाच्या खूप जवळचा असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अला वैकुंठपुरामुलू’ हा एक व्यावसायिक मनोरंजन करणारा चित्रपट होता. यात अल्लू अर्जुन, पूजा हेगडे आणि समुथिराकणी हे तिघेजण मुख्य भूमिकेत झळकले होते. त्रिविक्रम श्रीनिवास या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यासोबत या चित्रपटात तब्बू, जयराम, सुशांत, निवेथा पेथुराज, नवदीप आणि राहुल रामकृष्ण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.