सध्या बॉक्स ऑफिसवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ व ‘मडगांव एक्सप्रेस’ यांसारखे चित्रपटांचा बोलबोला सुरू आहे. पण दुसऱ्या बाजूला ‘आडु जीवितम-द गोट लाइफ’ या दाक्षिणात्य चित्रपटाची चर्चा सुरू आहे. २८ मार्चला मल्याळम, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि हिंदी या चार भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

‘आडु जीवितम-द गोट लाइफ’ या चित्रपटाने पाच दिवसांत ३५ कोटींची कमाई केली आहे. समीक्षकांकडून व प्रेक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक होतं आहे. अशातच या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकलेला दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनसंबंधित एक खुलासा सिनेमेटोग्राफर सुनील केएस यांनी केला आहे.

Saranya Ponvannan
पार्किंगच्या जागेवरून वाद अन् थेट जीवे मारण्याची धमकी, प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात शेजारणीने पोलिसांत दिली तक्रार
isha ambani sold her bungalow for 500 crores this celebrity couple
ईशा अंबानी-आनंद पिरामलचं आलिशान घर ‘या’ सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं विकत, तब्बल ५०० कोटींचा केला करार
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

हेही वाचा – ओळख, प्रपोज अन् मग होकार…; विजय चव्हाण व विभावरी जोशी यांची ‘अशी’ आहे लव्हस्टोरी

पृथ्वीराज सुकुमारनने ‘आडु जीवितम-द गोट लाइफ’ या चित्रपटात एक न्यूड सीन दिला आहे. या सीनसाठी अभिनेत्याने तीन दिवसांचा उपवास केला होता. त्यानंतर शरिरातून पाणी बाहेर काढण्यासाठी शेवटच्या दिवशी 30ml वोडका प्यायला होता. यावेळी लोकेशवर अभिनेत्याला खुर्चीत बसवून नेण्यात आलं होतं. एवढंच नाही तर चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी पृथ्वीराजला खुर्चीतून उठवावं लागलं होतं, असं सिनेमेटोग्राफर सुनील केएस यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं. याचा व्हिडीओ एक्सवर क्रिस्टोफर कनगराजने शेअर केला आहे.

हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ या नवीन मालिका कोणत्या स्थानावर? जाणून घ्या टॉप-१० मालिका

दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन आता हिंदी चित्रपटात झळकणार आहे. अक्षय कुमार व टायगर श्रॉफच्या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटात अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. १० एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.