बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या कामाला मिळणारी दाद म्हणजेच पुरस्कार. प्रेक्षकांच्या उडंद प्रतिसादासोबतच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या आणि आपल्या कलेचं योगदान देणाऱ्या या कलाकारांच्या दृष्टीने पुरस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. असाच एक मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करत ‘स्टारडस्ट पुरस्कार २०१६’ हा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. बी टाऊनमधील विविध कलाकार आणि त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. पुरस्कार सोहळ्यांची रंगत आणि कलाकारांचे धम्माल परफॉर्मन्सेस यांच्या जोडीनेच प्रेक्षकांनी उत्सुकता आहे ती म्हणजे कोणत्या कलाकाराच्या वाट्याला कोणता पुरस्कार आला याबबतची.
बॉलीवूड सुंदरींनी त्यांच्या सौंदर्याने आणि झगमगाटाने स्टारडस्ट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटला चारचाँद लावले. अमेरिकेहून मायदेशी परतलेली प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन, रेखा, अनुष्का शर्मा, सोनम कपूर, क्रिती सनॉन, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्रीदेवी यांसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
‘स्टारडस्ट पुरस्कार २०१६’ च्या विजेत्यांची संपूर्ण यादी:
सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (पिंक)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अनुष्का शर्मा (ऐ दिल है मुश्किल, सुलतान)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (संपादकीय पसंती)- शाहरुख खान (फॅन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (संपादकीय पसंती)- सोनम कपूर (नीरजा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रेक्षकांची पसंती)- शाहरुख खान (फॅन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (प्रेक्षकांची पसंती)- सोनम कपूर (नीरजा)
सर्वोत्कृष्ट खलनायक – जीम सार्भ (नीरजा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ऋषी कपूर (कपूर अॅण्ड सन्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शबाना आझमी (नीरजा)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- हर्षवर्धन कपूर (मिर्झिया)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री- सैयामी खेर (मिर्झिया), दिशा पतानी (एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी)
जीवनगौरव पुरस्कार- रेखा
ग्लोबल आयकॉन ऑफ द इयर- प्रियांका चोप्रा
सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय अभिनय- ऐश्वर्या राय बच्चन (सरबजीत)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (प्रेक्षक पसंती)- सुलतान
सर्वोत्कृष्ट कथा- कपूर अॅण्ड सन्स
सर्वोत्कृष्ट पटकथा- उडता पंजाब
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- सुलतान
सर्वोत्कृष्ट गीतकार- अमिताभ भट्टाचार्य (चन्ना मेरेया, ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (चन्ना मेरेया, ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- प्रितम (ऐ दिल है मुश्किल)