बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मलायका सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आंतरराष्ट्रीय योगा दिवस ४ दिवसांनी असताना मलायकाने तिचा फिटनेसचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मलायकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायकाने राखाडी रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत “चालणे, धावणे, श्वास घ्या, स्ट्रेच करा. पण सुरुवात तर करा. आंतरराष्ट्रीय योगा दिवस ४ दिवसांनी आहे. तुम्ही काय करत आहात? मी काय करत आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे? तर माझ्या बायोवर क्लिक करा आणि माझ्यासोबत लाइव्ह वर्कआऊट करा,” अशा आशयाचे कॅप्शन मलायकाने त्या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : ‘अमृताला कानशिलात लगावली मला त्याच वाईट वाटतं नाही’, इशा देओलने केला खुलासा

आणखी वाचा : कियाराने पुन्हा एकदा डब्बू रत्नानीसाठी केलं ‘टॉपलेस’ फोटोशूट

दरम्यान, मलायका या आधी तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने तिच्या घराजवळ घर घेतल्याने चर्चेत आली होती. मलायकाचे लाखो चाहते आहेत. मलायका नेहमीच सोशल मीडियावर फीटनेस टीप्स देताना देते.