छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. आता मालिकेतील एका कलाकाराचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन त्या कलाकाराला ओळखणे देखील आहे. तुम्ही हा फोटो पाहिलात का?

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अतिशय लोकप्रिय कलाकाराचा आहे. या फोटोमध्ये त्या कलाकाराने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून हा फोटो खूप जुना असल्याचे दिसत आहे. हा फोटो पाहून हा कलाकार नेमका कोण आहे? हे तुम्ही ओळखले का?
आणखी वाचा : खुशखबर! ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’

हा कलाकार दुसरा तिसरा कुणी नसून मालिकेतील तारक मेहता आहे. मालिकेत तारक मेहता ही भूमिका शैलेश लोढा यांनी साकारली आहे. स्वत: शैलेश लोढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून शैलेश लोढा यांना लोकप्रियता मिळाली. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. शैलेश एक अभिनेता असून कवि आणि लेखक देखील आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत.