तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलीवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली आहे. तमन्नाने आपल्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावलं आहे. तमन्नाकडे वेगवेगळ्या दागिन्यांचे कलेक्शनमध्ये आहे. यामध्ये डायमंड रिंगपासून हिऱ्यांच्या नेकलेसचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तमन्नाकडे जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा हिरा असलेली अंगठी आहे. पण ही अंगठी तिला एका खास व्यक्तीने भेट दिली आहे.

हेही वाचा- बहुचर्चित ‘टिपू’ चित्रपट झाला डब्बाबंद, निर्मात्यांची मोठी घोषणा; पोस्टरमुळे निर्माण झालेला मोठा वाद

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमन्ना भाटियाकडे जगातील पाचव्या क्रमांकाची डायमंड अंगठी आहे. ज्यामध्ये एक मोठा हिरा जडलेला आहे. रिपोर्ट्सनुसार या हिऱ्याची किंमत २ कोटी रुपये आहे. या हिऱ्याचा आकार अतिशय सुंदर आहे जो उत्कृष्ट चमक आणि टेक्सचरचा मानला जातो.

तमन्ना भाटियाने ही अंगठी स्वतः विकत घेतली नसून एका खास व्यक्तीने तिला ही अंगठी भेट दिली आहे. राम चरणची पत्नी उपासना हिने तमन्नाला ही अंगठी दिली आहे. खरं तर, ‘सये रा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटातील तमन्नाच्या अभिनयाने उपासना खूपच प्रभावित झाली होती. त्यानंतर त्यांनी ही अंगठी तमन्नाला भेट दिली.

हेही वाचा- “१२ वर्षांची असताना थेरपीला पाठवलं,” आमिर खानची लेक इराचा आजारपणाचा अनुभव; म्हणाली, “कुटुंबीयांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात तमन्नाशिवाय अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, अनुष्का शेट्टी, विजय सेतुपती, नयनतारा आणि निहारिका यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. राम चरणच्या निर्मितीमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. जो त्या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होता. ही अंगठी गिफ्ट केल्यानंतर उपासनाने एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती. ज्यामध्ये अभिनेत्री ही अंगठी परिधान करताना दिसली होती.