स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अरुंधती, आजी, आप्पा, संजना, अनिरुद्ध या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही सर्व पात्र प्रेक्षकांना अगदी आपलीशी वाटतात. या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण म्हणजे देविका. या मालिकेत देविका हे पात्र अभिनेत्री राधिका देशपांडे हिने साकारलं आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने दिवाळीच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.

सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीची धूम सुरू आहे. अवघ्या एक आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे घराघरात साफसफाई, नवीन वस्तूंची खरेदी, खमंग फराळ आणि इतर सर्वच गोष्टी चांगल्याच रंगात आल्या आहेत. दिवाळीच्या फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे जिन्नस महागल्यामुळे यंदा फराळ बनवण्याचा खर्चही वाढला आहे. अनेक घराघरात आजही दिवाळीच्या आठवडाभर आधीपासूनच फराळाचे पदार्थ करण्यास सुरुवात होते. चकली, शंकरपाळ्या, लाडू यासारखे अनेक पदार्थ फराळ म्हणून केले जातात. नुकतंच अभिनेत्री राधिका देशपांडे हिने या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “आधी धमकावले, नंतर अंधारात गाडी उभी केली आणि…” उबरमध्ये अभिनेत्री मनवा नाईकबरोबर घडला धक्कादायक प्रसंग

राधिकाने नुकतंच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी तिने चकली हातात धरली आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे. माझं असं ठाम मत आहे की चकल्या कधीही विकतच्या नसाव्यात, त्या घरी केलेल्या असाव्यात. तुम्हाला स्वतःला करता येत असतील तर उत्तमच पण जर त्या तुमच्या करता कोणी करून पाठवल्यात तर मी म्हणते तुमची काही हरकत नसावी, असे राधिका देशपांडेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “१ जूनला आम्ही ग्रुप बनवला अन् १४ दिवसांनी…” सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना प्रार्थना बेहरेने व्यक्त केली खंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सध्या राधिका ही या मालिकेत दिसत नाही. त्यामुळे तिने ही मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आई कुठे काय करते या मालिकेत विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राधिकाने यापूर्वी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटात काम केली आहे. ‘व्हेनिला स्ट्राबेरी अँड चॉकेलट’, ‘होणार सून मी या घरची’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.