‘येऊ कशी कशी मी नांदायला’ ही मालिका लोकप्रिय झाली आणि त्यातील ओम आणि स्वीटूच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. या मालिकेत ओमची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकरला त्या मालिकेने एक नवी ओळख दिली. तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आणि सर्वांचाच लाडका झाला. आता त्याला त्याच्या खऱ्या आयुष्यातली स्वीटू भेटली आहे. काल शाल्व किंजवडेकरचा साखरपुडा संपन्न झाला.

शाल्व त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरशी लवकरच लग्न गाठ बांधणार आहे. गेले दोन-तीन दिवस त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या फोटोमध्ये श्रेयाच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसली. तर तिच्याबरोबर त्या फोटोंमध्ये शाल्वही होता. त्या दोघांचं लग्न होत आहे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ती मेहंदी त्यांच्या लग्नाची नाही तर साखरपुड्याची होती. काल या दोघांचा साखरपुडा झाला.

आणखी वाचा : प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?

साखरपुड्या वेळी शाल्वने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाचा ब्लेझर घातला होता. तर श्रेयाने फुलांचं डिझाईन असलेला पांढऱ्या रंगाचा घागरा परिधान केला होता. त्यांच्या साखरपुड्याला त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच त्यांची मित्र मंडळीही उपस्थित होती. आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : ट्रोलिंग हासुद्धा एक प्रसिद्धीचा भाग- शाल्व किंजवडेकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेया आणि शाल्व ही दोघेही पुण्याची. गेली अनेक वर्ष ती दोघं एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाही अनेकदा त्यांनी त्यांचे प्रेम व्यक्त केलं आहे. तर आता या दोघांचा साखरपुडा संपन्न झाल्यावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही दोघं कधी लग्न गाठ बांधणार हे जाणून घेण्यासाठी शाल्वचे चाहते उत्सुक झाले आहेत.