scorecardresearch

Video : लहानपणी ‘अशी’ दिसायची प्रियदर्शनी इंदलकर, १५ वर्षांपूर्वीचा कॉमेडी शोमधील ‘तो’ व्हिडीओ समोर

Video : प्रियदर्शनी इंदलकरचा १५ वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पाहताना तुम्हालाही आवरणार नाही हसू

priyadarshini indalkar 2
लहानपणी 'अशी' दिसायची प्रियदर्शनी इंदलकर

छोट्या पडद्यावर आतापर्यंत अनेक मराठी कॉमेडी शो ने राज्य केलं आहे. ‘फू बाई फू’, ‘गंगबाई नॉनमॅट्रिक’ यांसारखे अनेक शो आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. असाच एक कॉमेडी शो म्हणजे ‘अफलातून लिटील मास्टर्स’. या कॉमेडी शोमध्ये अनेक लहान मुलांनी प्रेक्षकांची मन जिंकली. याच कार्यक्रमात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सहभागी झाली होती. तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला ओळखले जाते. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर मराठी चित्रपटात झळकताना दिसत आहे. ‘फुलराणी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियदर्शनी ही सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच प्रियदर्शनीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा : “शेवटचा हॅशटॅग महत्त्वाचा…” ओंकार राऊतच्या ‘त्या’ पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट चर्चेत

‘ई टीव्ही मराठी’ या वाहिनीवरील ‘अफलातून लिटील मास्टर्स’ या कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत प्रियदर्शनी ही कॉमेडी करताना दिसत आहे. यावेळी ती फक्त १२ वर्षांची होती. तिने या कार्यक्रमात प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या व्हिडीओत तिची आई देखील पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओत प्रियदर्शनी ही आई आणि साडीबद्दल विविध किस्से सांगताना दिसत आहे. यावेळी प्रशांत दामले आणि सुनील पाल हे परिक्षकाच्या खुर्चीत बसलेले पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या युट्यूबर व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील प्रियदर्शनीचे अनेक व्हिडीओही यानिमित्ताने चर्चेत आले आहेत.

आणखी वाचा : “मी एकुलती एक असल्याने…” लग्नाबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर प्रियदर्शनी इंदलकरची प्रतिक्रिया

दरम्यान ‘फुलराणी’ हा चित्रपट बुधवारी २२ मार्चला प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुबोध भावे ‘विक्रम’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सुशांत शेलार ‘सौरभ’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाची ट्रेलर, गाणी सुपरहिट झाली आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 14:52 IST

संबंधित बातम्या