अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे होय. मालिका, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून राधिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने निभावलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र अभिनेत्री तिने मंगळसूत्राविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

सगळे दागिने विकले, पण मंगळसूत्र…

अभिनेत्री राधिका देशपांडेने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत, मध्यंतरी ‘आरपार’च्या ‘वुमन की बात’ या कार्यक्रमात मंगळसूत्र या विषयावर बोलले गेले होते. त्यावर लोकांनी टोकाची मतं व्यक्त केली होती. बायकांनी मंगळसूत्र घालायचे की नाही? त्यावर तुझीदेखील कमेंट होती. मंगळसूत्रला एक भावना आहे, असं तुझं म्हणणं होतं. याबाबत विचारल्यावर अभिनेत्रीने म्हटले, “मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं आहे. हे माझ्यासाठी फार भावनिक आहे. सगळ्यांसमोर अग्नीच्या साक्षीनं आपण मंगळसूत्र घालतो, याचाच अर्थ असा की, आपल्या आई-वडिलांचं सगळं सोडून आता आपण देशपांडे होणार पेंडसेचे हे स्वत:ला आधी पटायला पाहिजे, स्वीकारलं पाहिजे.”

“मंगळसूत्र हा सुंदर दागिना आहे, असं आपण सहज बोलून जातो. सहज तर मीसुद्धा बोलू शकते; तर आम्हाला जेव्हा घर घ्यायचं होतं तेव्हा सगळं सोनं मी विकलं, पण मी मंगळसूत्र विकू शकले नाही. मंगळसूत्र विकू शकत नाही, कारण त्यामध्ये भावना आहेत. ते घालायचं की नाही, कधी घालायचं हे मी ठरवेन. याचं कारण असं की, आजूबाजूला लोकं असे आहेत की ते ओढून नेलं तर काय करायचं? मी असंही पाहिलेलं आहे की, जेव्हा सुरुवातीला मी ऑडिशन्सला जायचे तेव्हा माझ्याबरोबर मुलगी असायची. तर हिला मुलगी आहे, तिनं मंगळसूत्र घातलं होतं, त्यामुळे कॉलेजमधली तरुणी आपण तिला दाखवू शकत नाही, अशा गोष्टी बोलल्या जात होत्या. मला विचारायचे की तुझं लग्न झालंय ना, मग आता तू ऑडिशन्स देतेय? तर मंगळसूत्र घातल्यामुळे मला भूमिका नाकारल्या गेल्या. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत मला कॉलेज संपवून जॉब लागलेली मुलगी दाखवली आहे. तेव्हा माझं वय होतं ३३ वर्षे आणि मालिकेत २३ वर्षे दाखवलं होतं. तर त्यासाठी मी ऑडिशन्स दिली नव्हती, आधी एक काम केलं होतं, त्यातून मला त्या मालिकेतील भूमिका मिळाली होती.”

हेही वाचा: Video : “आयुष्यातला अंधार…”, सावली आणि सारंगचे लग्न होणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राधिका देशपांडे तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या परखड वक्तव्यामुळेदेखील सतत चर्चेत असताना दिसते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक होताना दिसले होते. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.