आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत अभिनेत्री अमृता खानविलकर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील तिने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामाचे लाखो चाहते आहेत. अभिनय क्षेत्रात तिने चांगलंच नाव कमावलं आहे. आता तिचा आवडता अभिनेता दिग्दर्शक कोण हे तिने सांगितलं आहे.

अमृता खानविलकर ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. या एपिसोडचे काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान तिला दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे चांगला की प्रसाद ओक याचं उत्तर तिने दिलं आहे.

आणखी वाचा : पतीने दिलेल्या बोल्ड सीन्सवर ‘अशी’ होती अमृता खानविलकरची प्रतिक्रिया, खुलासा करत हिमांशू म्हणाला…

अमृताने ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध भावेने केलं होतं. तर अमृताची प्रमुख भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं. या दोघांपैकी कोण चांगलं हे तिने सांगितलं. अमृता आणि अवधूत गुप्तेचा या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अवधूत अमृताला काही प्रश्न विचारत आहेत. अवधूतने अमृताला विचारलं, “कोणता अभिनेता दिग्दर्शक म्हणून जास्त चांगला आहे? सुबोध भावे की प्रसाद ओक?” त्यावर अमृताने “प्रसाद ओक” असं उत्तर दिलं.

हेही वाचा : अमृता खानविलकरने केदार शिंदेंच्या लेकीसाठी पाठवली खास भेट, फोटो पोस्ट करत सना म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर अमृता विविध विषयांवर बोलली. त्यामुळे आता तिच्या चाहत्यांना या तिच्या आगामी एपिसोडची खूप उत्सुकता लागली आहे.