Bigg Boss 18: हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता चौथा आठवडा सुरू झाला आहे. नुकताच वीकेंड वार पार पडला. या वीकेंड वारमध्ये सलमान खानने अविनाश मिश्राची चांगलीच कानउघडणी केली. त्याबरोबरचं करणवीर मेहरादेखील सुनावलं. रविवारी वीकेंड वारला आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’चं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शन रोहित शेट्टीने उपस्थिती लावली होती. यावेळी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अजय देवगणबरोबर झालेली एक घटना सलमान खानने सांगितली.

रविवारी, वीकेंड वारमध्ये ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी व अजय देवगणने ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांबरोबर धमाल-मस्ती केली. रोहित शेट्टी ‘बिग बॉस’च्या घरात गेला होता. त्याने यावेळी सदस्यांबरोबर एक खेळ खेळला आणि एका सदस्याला घराबाहेर आणलं. तिसऱ्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर झाले. मुस्कान बामनेनंतर नायरा बनर्जी एलिमिनेट झाली. त्यानंतर सलमान खानबरोबर रोहित आणि अजयने ‘बिग बॉस’च्या मंचावर गप्पा मारल्या. यावेळी अजय व सलमानने त्यांच्या काळातील चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी सांगितलं.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…
singham again movie box office collection this marathi writer writes story
मराठी लेखकाने लिहिलीये Singham Again ची कथा! वीकेंडची कमाई पाहून म्हणाला, “रोहित शेट्टी सर…”
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?

हेही वाचा – Video: “अशा काहीही अफवा पसरवू नका”, ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकरने केली विनंती, नेमकं काय घडलं? वाचा…

तेव्हा सलमान अजयला म्हणाला, “‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तुझ्या डोळ्याला जखम झाली होती ना?” अजय म्हणाला, “हां.” त्यानंतर सलमानने तो प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “अजयने मला एक शॉर्ट दाखवला होता. ज्याच्यात वेळ चुकली. एक व्यक्ती लाकूड घेऊन अजयला मारायला येत होती आणि त्याची वेळ चुकीची होती. त्यामुळे त्या लाकडाचा सरळ फटका अजयच्या डोळ्यावर पडला.” त्यानंतर अजय म्हणाला की, दोन-तीन महिने दिसत नव्हतं. छोटीशी शस्त्रक्रिया झाली असून आता बरीच सुधारणा झाली आहे. पुढे सलमान म्हणाला, “अशा अ‍ॅक्शन सीनमुळे आमच्याबरोबर हे सतत होतं राहत.” तेव्हा अजय म्हणाला, “पण आजकालच्या मुलांसाठी अ‍ॅक्शन करणं सोप झालं आहे. जेव्हा आपण सुरू केलं. तेव्हा चार मजल्यावरून केबल शिवाय उड्या मारायच्या होत्या.”

हेही वाचा – Video: “जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा”, संकर्षण कऱ्हाडेची कविता ऐकून कलाकार झाले भावुक, पाहा व्हिडीओ

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तेव्हापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात अजय देवगणसह करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. १ नोव्हेंबरला ‘सिंघम अगेन’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.