वर्षभरापूर्वी सुप्रसिद्ध विनोदवीरांपैकी एक विनोदवीर सुनील ग्रोवरने चाहत्यांना एक दुःखद बातमी दिली. सुनीलला हृदयविकाराच्या झटक्याचा सामना करावा लागला. मुंबईच्या एशियन हार्ट इंस्टिट्यूटमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. एक नव्हे तर त्याच्यावर चार बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण तेव्हा नेमकं काय घडल होतं? सुनीलची अवस्था कशी होती? याबाबत त्याने आता भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – “पार्टीमध्ये दारू प्यायल्यानंतर…” विराट कोहलीचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, अनुष्का शर्मा म्हणाली, “त्याला…”

बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर सात दिवसांनी सुनीलला रुग्णालयामधून घरी सोडण्यात आलं होतं. मात्र त्याची अवस्था अगदी बिकट झाली होती. आता त्याने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. सुनील म्हणाला, “मी आधीच करोना रुग्ण होतो. त्यानंतर मला हृदयविकाराचा झटका आला”.

आणखी वाचा – शहरातला फ्लॅट सोडून महाबळेश्वरमध्ये घर बांधत तिथेच स्थायिक झाली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; आता नवऱ्यासह करतेय शेती, म्हणाली

“त्यानंतर एक ते दोन महिने माझं मानसिक स्थितीही ठीक नव्हती. मी घरी पुन्हा येईन की नाही याचीही मला शंका होती. पण माझं नशिब की, आता सगळं काही ठीक आहे. पण त्यावेळी माझी अवस्था बिकट होती. आता मी पूर्णपणे ठीक आहे. माझ्या कामाचा मी मनसोक्त आनंद घेत आहे”.

आणखी वाचा – मोठा अपघात, केईएम रुग्णालयामध्ये तीन महिने उपचार अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनीलला २०२२च्या सुरुवातीलाच या कठिण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. तब्येत सुधारत असताना सुनीलने सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत त्याच्या या कटू अनुभवाबाबत सांगितलं होतं. ‘माझी ट्रीटमेंट चांगली झाली. आता मी यातून बरा होत आहे. सर्वांच्या प्रार्थनांसाठी मी आभारी आहे’. असं सुनीलने तेव्हा म्हटलं होतं.