प्रेक्षकांना भुरळ घालणारी २००१ मधील ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. एक आदर्श, एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं हे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. कुटुंबावर आधारित या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी गंगाधर टिपरे यांची भूमिका साकारली होती. जवळपास २२ वर्षांनी दिलीप प्रभावळकर यांनी या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. हेही वाचा- “बाकी काही नसलं तरी…”; वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ जाधवने लाडक्या लेकीला दिलं आश्वासन, पोस्ट चर्चेत या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम, रेश्मा नाईक या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. या सर्वांनी नुकतीच ‘द क्राफ्ट’ या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. यावेळी या मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदेही उपस्थित होते. या मुलाखतीमध्ये त्या सर्वांनी या मालिकेच्या शूटिंग दरम्यानच्या आठवणी जागवल्या. प्रभावळकर म्हणाले. "मालिकेत मला श्वानाबरोबर संस्कृतमध्ये बोलायचं आहे असा एक सीन होता. मी संस्कृत भाषेचे तज्ञ आणि अभिनेते दाजी भातोडेकर यांना फोन केला. त्यांनी प्रभावळकरांना विचारलं तुला कशाला संस्कृत शिकायचंय. त्यावर प्रभावळकर म्हणाले. श्वानाशी बोलायला. प्रभावळकरांनी दिलेले हे उत्तर ऐकून उपस्थित सर्वजन हसायला लागले. त्यानंतर प्रभावळकरांनी भातोडेकरांना मालिकेमधील सीनबद्दल सांगितलं. त्यांनी प्रभावळकरांना चार वाक्य संस्कृतमध्ये लिहून दिले. त्यानंतर दोन भागांमध्ये प्रभावळकरांनी श्वानाबरोबर संस्कृतमध्ये बोलण्याचा सीन शूट केला होता." हेही वाचा- “आपली जात वेगळी आहे”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितला ब्रेकअपचा अनुभव, म्हणाला, “तिचे आईबाबा…” एकंदरीतच हे कुटुंब आपल्या आसपासचे वाटावे इतके खरे, मनाला भावणारे. आपले विश्व विसरायला लावून आपण अगदी त्यांच्यात सामावून जातो इतके अप्रतिम कलाकृती. दिलीप प्रभावळकरांच्या अनुदिनी या संग्रहावर तयार केलेली ही मालिका अजरामर ठरली.