टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास करणारी गौहर खान सध्या गर्भवती आहे. तिने अलीकडेच खुलासा केला आहे की, ती दुसऱ्यांदा आई होणार आहे आणि या टप्प्याचा आनंद घेत आहे. या अभिनेत्रीने यापूर्वी २०२३ मध्ये तिचा पहिला मुलगा जेहानला जन्म दिला.

२०२३ मध्ये या जोडप्याने मुलगा जेहानचे स्वागत केले. तेव्हापासून गौहर रुपेरी पडद्यापासून दूर आहे. या सर्वांमध्ये, अभिनेत्रीने आता स्वतःचा व्लॉग सुरू केला आहे. या व्लॉगमध्ये गौहर खानने तिच्या गर्भपात, गर्भधारणा व प्रसूतीबद्दल सांगितले. त्याच वेळी तिने सुनील शेट्टीच्या सी सेक्शन डिलिव्हरीवरील विधानावरही राग व्यक्त केला आहे.

सी सेक्शन डिलिव्हरीबद्दल सुनील शेट्टी काय म्हणाले होते?

‘न्यूज१८’ला दिलेल्या मुलाखतीत, नुकतेच सुनील शेट्टीने त्याची मुलगी अथियाचे कौतुक केले आणि सांगतले की, तिने सी-सेक्शन कम्फर्टऐवजी नॉर्मल प्रसूतीचा पर्याय निवडला होता. सी सेक्शन डिलिव्हरीवरील त्याच्या टिप्पणीवर बरीच टीका झाली. आता गौहर खानदेखील सुनील शेट्टीच्या या टिप्पणीवर संतापली आहे.

सुनील शेट्टीच्या विधानावर गौहर खानची काय प्रतिक्रिया…

‘माँ नोरंजन’ नावाच्या तिच्या यूट्यूब पॉडकास्टमध्ये, गौहर खान गर्भपात आणि सी-सेक्शनच्या संघर्षाबद्दल उघडपणे बोलताना भावनिक झाली. गौहर खान सुनील शेट्टीच्या अलीकडील टिप्पणीवर प्रतिक्रिया देत म्हणाली, “मला माझ्या आवाजात ओरडून म्हणायचे आहे की, तुम्ही हे कसे म्हणू शकता? अभिनेत्रीने नॉर्मल आणि सी-सेक्शन प्रसूती वेदनादायक असल्याचे वर्णन केले. गौहरने सांगितले की, तिची पहिली प्रसूती सी-सेक्शनद्वारे झाली. ती पुढे म्हणाली, “या विषयावर इतके मिथक आहेत की, जर कोणी सी-सेक्शन घेत असेल, तर तो एक सोपा पर्याय आहे. इतकी चुकीची माहिती कशी असू शकते? ज्याने मुलाला जन्म दिलेला नाही, त्याला सी-सेक्शन किती वेदनादायक आहे हे कसे कळेल.”

तुम्हाला माहीत आहे का की, तिला गर्भपाताचा त्रास सहन करावा लागला आहे? हा पहिला मुलगा जेहानच्या जन्मापूर्वीचा आहे. तिने स्वतः हे उघड केले आहे. गौहरने तिच्या मातृत्वाच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. खरे तर, गौहर खानने अलीकडेच तिचा स्वतःचा एक व्लॉग सुरू केला आहे. त्यामध्ये ती तिच्या मातृत्वाच्या प्रवासाबद्दल बोलताना दिसते आहे. या दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाबद्दल तसेच कठीण टप्प्याबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती एकेकाळी खूप तुटली होती. या व्लॉगमध्ये तिने तिच्या गर्भपाताचा खुलासा केला आहे आणि ती रडली आहे.

गौहर खानने तिच्या व्लॉगमध्ये खुलासा केला आहे की, जेहानच्या जन्मापूर्वी ती एकदा गर्भवती होती. तिचा पती झैद दरबार खूप आनंदी होता. पण, लवकरच त्याचा आनंद दुःखात बदलला. अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, ती नऊ आठवड्यांची गर्भवती असताना तिचा गर्भपात झाला. गौहर हा तिच्या आयुष्यातील सर्वांत कठीण टप्पा मानते. आयुष्याच्या या टप्प्याबद्दल बोलताना अभिनेत्री रडली. तिने याबद्दल कधीही कोणालाही सांगितले नव्हते. ती म्हणते की, ती हे दुःख शब्दांत व्यक्त करू शकत नाही. नऊ आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर गौहरने तिचे मूल गमावले आहे यावर विश्वास ठेवणे खूप कठीण होते. दोन महिन्यांहून अधिक काळ झाला होता आणि तो खूप कठीण काळ होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौहर खानने टीव्ही ते बॉलीवूड आणि ओटीटीपर्यंत तिच्या अभिनय कौशल्याची सिद्धता केली आहे. ती ‘बिग बॉस ७’ या टीव्ही शोची विजेती राहिली आहे. ती शेवटची सरगुन मेहताच्या शोमध्ये दिसली होती.