बॉलिवूडच्या धक धोका गर्ल माधुरी दीक्षितने आजवर चित्रपटातून नृत्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेली अनेकवर्ष ती या क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या ती कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या लोकप्रिय कार्यक्रमात दिसत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक भागात नवे पाहुणे येत असतात. माधुरी त्यांच्याबरोबर ठेका धरताना दिसते. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती एका गोवन गाण्यावर नाचताना दिसली आहे.
मराठमोळा संगीतकार अवधूत गुप्ते याने गायलेले गाणे ‘माझा वांगडा चाल ना गो’ हे गोवन हिंदी भाषेतील गाणे लोकप्रिय ठरले आहे. माधुरीने या गाण्याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘आयुष्य हे आठवणी तयार करत असतं’. असा कॅप्शनदेखील तिने दिला आहे. तिच्या या पोस्टवर अवधूतने कॉमेंट केली आहे वाव, ‘इतका मोठा सन्मान’ या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Photos : यावर्षीच्या फ्लॉप चित्रपटांची यादी; बिग बी, अक्षय कुमारसह दिग्गजांच्या चित्रपटांचा समावेश
माधुरी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कायमच रील्स शेअर करत असते. तिचे चाहतेदेखील याचे कौतुक करत असतात. नुकतेच तिने दिल तो पागल हैं चित्रपटाला २५ वर्ष झाली म्हणून रील शेअर केले होते. तिच्या या रीलला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. माधुरीने दिवाळी पार्टीतला एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती काजोलबरोबर ठेका धरताना दिसली होती.
माधुरीच्या ‘मजा मा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये माधुरीचं पात्र हे समलिंगी दाखवलं असल्याने बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. माधुरी आता संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमध्येही झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.