Lakshmi Niwas Fame Actress Divya Pugaonkar Wedding : ‘झी मराठी’वर नव्याने सुरू झालेली ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील भावना, लक्ष्मी, श्रीनिवास, सिद्धू, जान्हवी अशा प्रत्येक पात्राला अल्पावधीतच घराघरांत पसंती मिळाली आहे. या मालिकेत जान्हवीची भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकर साकारत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दिव्याच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मालिकेत ऑनस्क्रीन विवाहसोहळा पार पडल्यावर आता दिव्या पुगावकर वैयक्तिक आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

मेहंदी, संगीत, साखरपुडा असे लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर दिव्याने आता अक्षय घरत याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. १९ डिसेंबर २०२१ रोजी या दोघांचा तिलक समारंभ पार पडला होता. यावर्षी नवीन वर्षाच्या प्रारंभी दिव्याने ती लवकरच लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी लग्नपत्रिकेची लहानशी झलक शेअर करत दिली होती. यानंतर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील दिव्याच्या सहकलाकारांनी तिच्यासाठी खास केळवणाचं आयोजन देखील केलं होतं. दिव्या आणि अक्षयचं एका रेस्टॉरंटमध्ये केळवण साजरं करण्यात आलं. यानंतर दिव्याचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अभिनेत्रीचा विवाहसोहळा आज थाटामाटात पार पडला आहे.

दिव्याने लग्नसोहळ्यात मराठमोळा लूक केला होता. पिवळ्या रंगाची सुंदर साडी, त्यावर लाल रंगाची शाल, गळ्यात सुंदर नेकलेस, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या नववधूच्या लूकमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीच्या लग्नातील पहिला फोटो सिद्धार्थ खिरीडने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्याने “दिव्या का दुल्हा” असं कॅप्शन दिलं आहे.

दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Lakshmi Niwas Fame Actress Divya Pugaonkar Wedding
Lakshmi Niwas Fame Actress Divya Pugaonkar Wedding

दरम्यान, दिव्या पुगावकरवर सध्या संपूर्ण मनोरंजनविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याला मालिकाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर दिव्याने यापूर्वी ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या ती ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची म्हणजेच जान्हवीची व्यक्तिरेखा साकारत आहे.