सध्या सर्वत्र गणपती बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. कोकणात गणेशोत्सव आणि शिमगा या दोन सणांना विशेष महत्त्व असतं. बहुतांश मराठी कलाकार मूळचे कोकणातील असल्याने सर्वांच्या घरी सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे निखिल बने. सामान्य कुटुंबातील निखिलला हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली.

हेही वाचा : “तुझ्या मामूवर एक उपकार कर”, सलमान खानची भाचीसाठी भावनिक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाला…

निखिल बनेचं मूळ गाव कोकणातील चिपळूण येथे आहे. गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामुळेच मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात आपल्या मूळ गावी जायला निघतात. निखिलने त्याच्या कुटुंबीयांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “खुपते तिथे गुप्ते १६ भागांमध्येच संपत आहे कारण…”, अवधूत गुप्तेने केला खुलासा

निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या कुटुंबीयांची झलक पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या आगमाचा उत्साह, सामानाची बांधबांध, प्रवास सुरु करण्यापूर्वी देवाची केलेली प्रार्थना या सगळ्या गोष्टी अभिनेत्याच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात. निखिलने या व्हिडीओला, “चाकरमानी निघाले…आम्ही झो जाताव पुढ, तुम्ही या मागना…आतुरता आगमनाची” असं मालवणी भाषेत कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : उपेंद्र लिमये यांच्या ‘रोप’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त

View this post on Instagram

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने, “किती छान… अशीच आपली संस्कृती परंपरा जपून पुढे जा.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, दुसऱ्या एका युजरने, “सावकाश जावा!! डोळे भरून इले” असं म्हटलं आहे. यापूर्वी शिमगोत्सवाला अभिनेत्याने कोकणातील संस्कृतीची खास झलक आपल्या चाहत्यांना दाखवली होती.