जय भानुशाली आणि माही विज या टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडप्याला तारा नावाची गोंडस मुलगी आहे. ताराचा जन्म २०१९ मध्ये झाला. मात्र, ताराला जन्म देताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याबाबत अभिनेत्री माही विजने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : सेटवर २०० लोक, शुटिंग सुरू असतानाच शिरला बिबट्या अन्…; मराठी मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

माही विजने IVF च्या माध्यमातून ताराला २०१९ जन्म दिला. नुकत्याच ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत माहीने तिला जुळी मुलं होणार होती असे सांगितले. वयाच्या ३४ व्या वर्षी अभिनेत्रीने पहिल्यांदा IVF केले. त्यानंतर माहीने केलेल्या आयव्हीएफच्या तीन प्रक्रिया अयशस्वी झाल्या. पुढे अभिनेत्रीने याबाबत कुटुंबीयांना कल्पना देऊन काही काळ या प्रक्रियेतून ब्रेक घेतला. माही म्हणाली, “जय आणि मला तेव्हा काहीच माहिती नव्हते. आम्ही पूर्णपणे डॉक्टरांवर अवलंबून होतो.”

हेही वाचा : “Happy Birthday सुंदरी!”, क्रिती सेनॉनच्या वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकरने शेअर केलेल्या फोटोची चर्चा

माही पुढे म्हणाली, “आम्ही त्यानंतर डॉक्टर बदलला आणि ३६ व्या वर्षी पुन्हा एकदा IVF चा प्रयत्न केला. या चौथ्या प्रयत्नात मला दोन जुळी मुलं होणार होती. यावेळी डॉक्टरांनी माझी जुनी हिस्ट्री पाहिली, सोनोग्राफी केली आणि माझ्या केसमध्ये अजिबात घाई केली नाही. IVF सायकल सुरु असताना मी डॉक्टरांनी सांगितली तशी काळजी घेतली. सगळे काही देवावर सोडले होते.”

हेही वाचा : “‘गदर’ला काहीजण ‘गटर’ बोलायचे”, अमीषा पटेलने केला खुलासा; म्हणाली, “सलग ६ महिने, दररोज १२ तास…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्रीने पुढे सांगितले, “पहिल्या तीन महिन्यात मी पूर्णपणे बेडरेस्टवर होते. फक्त सोनोग्राफीसाठी रुग्णालयात जायचे. रोज इंजेक्शन देण्यासाठी नर्स आमच्या घरी यायची. माझ्या सोशल आयुष्यापासून मी पूर्णपणे दूर होते आणि तेव्हा प्रचंड शांत होते. पण, जुळी मुलं होणार म्हणून मनातून आनंदी होते. आम्हा दोघांनाही तेव्हा धक्का बसला जेव्हा आम्हाला डॉक्टरांनी तुम्ही दोन्ही मुलं गमावू शकता असे सांगितले. अशा परिस्थितीत मला तारा झाली. पण, दुर्दैवाने आमचे दुसरे बाळ जगू शकले नाही ते गर्भातच दगावले. आमची तारू ‘ए प्लस’ होती आणि ते दुसरे बाळ ‘ए’ होते. एवढ्या कठीण प्रसंगात एक बाळ तरी आमच्याबरोबर राहावे हीच प्रार्थना मी देवाकडे करत होते. “