मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेल्या सहा वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. या कार्यक्रमाचा एक वेगळा आणि मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. हा चाहता वर्ग महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून जगभरात आहेत. त्यामुळेच जगभरातील महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या दौऱ्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकार मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. या कार्यक्रमाचा जितका मोठा चाहता वर्ग आहे तितकाच मोठा चाहता वर्ग कार्यक्रमातील कलाकारांचा झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील कलाकार हे नेहमी चर्चेत असतात. अशातच परीक्षक प्रसाद ओकने कार्यक्रमासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. जे सध्या चर्चेत आलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणने सांगितला लग्नाचा प्लॅन; निक्की, अभिजीतला म्हणाला…

अलीकडेच प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओकने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी बायकोला देत असलेल्या कमिटमेंट विषयी प्रसाद ओक बोलत होता. तेव्हा म्हणाला, “गेल्या चार-पाच वर्षांपासून काही कमिटमेंट पाळता येत नाहीये. आमच्या हास्यजत्रेवाले हलकट लोक माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला मुद्दाम शूटिंग लावतात.” तेव्हा मंजिरी ओक म्हणाली, “ये काय रे …मुद्दाम का करतील…पण ते आमचा वाढदिवस सेलिब्रेट पण करतात. म्हणजे असं काही नाही.”

पुढे प्रसाद ओक म्हणतो, “अरे म्हणजे प्रेमळ आहेत. पण हलकट आहेत. तीन वर्ष एक माणूस सांगतोय ७ जानेवारीला शूटिंग नका लावू. बरोबर ७ जानेवारीला शूटिंग लावतातच.” त्यानंतर मंजिरी ओक म्हणाली, “त्यादिवशी आम्हाला कुठे हॉटेल वगैरे मध्येपण जाता येत नाही.”

हेही वाचा – Video: “अरबाजने सॉरी म्हटल्यावर लगेच तू त्याच्या गळ्यात पडणार” म्हणत सूरजने निक्कीला लगावला टोला अन् लावली ट्रॉफीची पैज

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर आणि मेघा धाडेची धमाल-मस्ती, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तुमची मैत्री…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रसाद ओकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा ‘धर्मवीर २’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. २७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी प्रसाद ओकच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली. ‘सुशीला-सुजीत’ असं नव्या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसाद ओकने सांभाळली आहे. २०२५मध्ये प्रसादचा हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.